Famous among the Ghadge & Soon series abroad also | ​घाडगे & सून मालिका परदेशामध्ये देखील फेमस

कलर्स मराठीवरील घाडगे & सून ही मालिका सुरू झाल्यापासूनच बरीच चर्चेत आहे. या मालिकेमधील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. उत्तम कथानक, अभिनेते यामुळे प्रेक्षकांना ही मालिका खिळवून ठेवत आहे. घाडगे & सून मालिकेमधील अक्षय घाडगे म्हणजेच सगळ्यांचा लाडका चिन्मय उद्गिरकर तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आता तर परदेशामध्ये देखील मालिका आणि अक्षयच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. चिन्मय त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून त्याच्या पत्नीसह नुकताच बाली आणि दुबईला जाऊन आला. तिथे त्याला मिळालेल्या प्रतिक्रिया त्याने शेअर केल्या 
आहेत. या प्रतिक्रिया ऐकल्यावर घाडगे & सून ही मालिका आणि अक्षयचे पात्रं लोकांना खूपच आवडत असल्याचा विश्वास तुम्हाला देखील बसेल. चिन्मय सांगतो, “दुबईमध्ये महाराष्ट्र मंडळामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने मी तिथे गेलो होतो. तिथे एक छोटी मुलगी माझ्याजवळ धावत आली आणि ती म्हणाली, अरे अक्षयदादा कियारा शिमलामध्ये आहे तिला तिकडे शोध... तिने ज्याप्रकारे मी दिसताच माझ्याजवळ येऊन ही प्रतिक्रिया दिली, त्यामध्येच सगळे काही दडलेले होते. माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव होता. यावरून माझी मालिका सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडत आहे हे मला कळले. तसेच बाली मध्ये असताना देखील मला असाच एक अनुभव आला होता. बालीमध्ये आम्ही चार दिवस गेलो होतो. पण तिथे काही कारणास्तव आम्हाला काही दिवस अजून राहावे लागले. फ्लाइट्स रद्द झाल्या असल्याने कुठे राहावे असा आम्हाला प्रश्न पडला होता. विमानतळ पण बंद होते. तसेच तिथून जाण्या-येण्याची काहीच सोय नव्हती. अशा वेळेस आम्हाला एक मराठी कुटुंब भेटलं, जे मला मालिकेमुळे ओळखत होते. त्यांच नावं वाळवणकर असून ते उद्योगपती आहेत. त्यांनी मला त्यांच्या घरी नेले. त्यांच्या घरी दोन इंडोनेशियन मुली होत्या. त्या मला बघताच क्षणी आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या हाय अक्षय... याचा अर्थ त्या देखील घाडगे & सून ही आमची मालिका त्या परिवारासोबत पाहातात हे मला कळले. त्या पुढे म्हणाल्या “अक्षयने पाईपवर चढून कियाराला सोडविण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रकारचे दृश्य पुन्हा देऊ नका आणि असा सीन पुढे करायचाच असेल तर नक्कीच काळजी घ्या. या सगळ्यातून मी आजवर केलेल्या कामाची पावती प्रेक्षकांकडून मला मिळाली. माझी मालिका महाराष्ट्रातच नाहीतर तर परदेशामध्ये देखील लोकप्रिय आहे याचा मला आनंद होत आहे.  
 
Also Read : घाडगे & सून मालिकेतील चिन्मय उद्गिरकर, सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमयेचा फोटो सोशल मीडियावर हिट
 
Web Title: Famous among the Ghadge & Soon series abroad also
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.