Fame salute Paul was introduced to a duet journalist before coming in | ​एक दुजे के वास्ते फेम नमिक पॉल अभिनयात येण्यापूर्वी होता पत्रकार

एक दुजे के वास्ते या मालिकेत नमिक पॉलने काम केले होते. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकला होता. ही मालिका केवळ काहीच भागांची होती. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या मालिके आधी प्रेक्षकांना त्याला कबूल है या मालिकेत छोट्याशा भूमिकेत पाहायला मिळाले होते. आता तो एक दिवाना था या मालिकेत झळकणार असून या मालिकेत तो एका भुताच्या भूमिकेत दिसणार आहे. नमिक आज अभिनेता असला तरी त्याने एक पत्रकार म्हणून अनेक वर्षं काम केले आहे. याविषयी नमिक सांगतो, मी मनोरंजन विश्वाचा पत्रकार नव्हतो, पण राजकारणाच्या बातम्या कव्हर करत होतो. पण मीडिया क्षेत्र हे माझ्यासाठी नसल्याचे मला सुरुवातीपासूनच माहीत होते. मीडियात काम करत असताना तुम्हाला दिवसातील अनेक तास द्यावे लागतात. कोणतीही वेळ असली तरी स्टोरी करावीच लागते. तसेच एका स्टोरीमागे कित्येक तास जातात. अनेक लोक गेली अनेक वर्षं या क्षेत्रात असून चांगले यश मिळवत आहेत. पण मला त्या क्षेत्रात तितकासा रस वाटत नव्हता. मीडियाबद्दल आणि रिपोर्टिंगबद्दल मला तितकेसे प्रेम नव्हते. त्या तुलनेत माझा कल अभिनयाकडे अधिक होता. काहीही झाले तरी मला अभिनयक्षेत्रातच करियर करायचे होते. मी एनडिटिव्ही या प्रतिष्ठित वाहिनीत काम करत होतो. पण ही नोकरी मी सोडली आणि मी कायमचे मुंबईत राहायला आलो. सुरुवातीच्या काळात मला खूपच स्ट्रगल करावा लागला. मी अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण मुख्य भूमिका मिळण्यासाठी मला दोन ते तीन वर्षं मेहनत घ्यावी लागली. या क्षेत्रात काम मिळणे खरेच सोपे नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण या क्षेत्राविषयी माझ्या मनात प्रेम असल्याने मी मागे हटलो नाही. आज मी माझ्या कामामुळे ओळखला जातो आहे. तसेच एक अभिनेता म्हणून मी माझी वेगळी ओळख मी निर्माण केली आहे याचा मला प्रचंड आनंद होत आहे.

Also Read : विक्रम सिंह चौहान आणि नमीक पॉलमध्ये आहे एक गोष्ट कॉमन
Web Title: Fame salute Paul was introduced to a duet journalist before coming in
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.