Exhibit from the series of emblem of Salil Ankola, | सलील अंकोला घेणार कर्मफलदाता शनी या मालिकेतून एक्झिट

कलर्स वाहिनीवरील कर्मफलदाता शनी या पौराणिक मालिकेला सध्या प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर सलील अंकोलाने सुर्यदेवाची भूमिका साकरली आहे. शनीदेवाची भूमिका कार्तिकेय मालवीयने या बालकलाकारने साकरली आहे. आता ही मालिका दहा वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत रोहित खुराणा शनीदेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेतील ही भूमिका महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. अनेक कलाकारांचे ऑडिशन घेतल्यानंतर या भूमिकेसाठी रोहितच योग्य असल्याचे या मालिकेच्या टीमचे म्हणणे पटले. कर्मफलदाता शनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे रोहित खुराणा सध्या खूपच खूश आहे. 
कर्मफलदाता शनी या मालिकेने लीप घेतल्यानंतर काही नवे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप वाईट बातमी आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर या मालिकेत सलील अंकोला असणार की नाही याबाबत आता प्रश्न पडला आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर सलील प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लीपनंतर प्रेक्षकांना सूर्यदेव ग्राफिकल रूपात पाहायला मिळणार आहे आणि या सूर्याला मानवीय आवाज लाभणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत सलील नसणार असे म्हटले जात आहे. 
सलील हा प्रेक्षकांचा लाडका असल्याने त्याच्या जाण्याने प्रेक्षकांना त्याची कमतरता नक्कीच भासणार आहे. सलील हा क्रिकेटर असून त्याने अभिनयक्षेत्रातही त्याचे नाव कमावले आहे. त्याने कुरूक्षेत्र, चुरा लिया है तुमने यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. कोरा कागज, करम अपना अपना, विक्रांत और गबराल यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. पॉवर कपल या कार्यक्रमात सलील त्याची पत्नी रियासोबत झळकला होता. 
सलील कर्मफलदाता शनी या मालिकेचा भाग असणार की नाही हे प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळणार आहे.  

Also Read : कर्मफलदाता शनी या मालिकेत ​रोहित खुराणा साकारणार शनीची भूमिका
Web Title: Exhibit from the series of emblem of Salil Ankola,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.