Erica Fernandes wishes her Kuch Rang Pyar Ke Aise Bhi’s reel son a happy birthday with an adorable photo | एरिका फर्नांडिसने तिच्या ऑनस्क्रीन मुलाच्या वाढदिवसाला अशाप्रकारे दिल्या शुभेच्छा
एरिका फर्नांडिसने तिच्या ऑनस्क्रीन मुलाच्या वाढदिवसाला अशाप्रकारे दिल्या शुभेच्छा

ठळक मुद्देतिने इन्टाग्राम स्टोरीमध्ये कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील तिच्या चिमुकल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने विदवान शर्मा या चिमुकल्यासोबतचा तिचा फोटो पोस्ट करून माझा छोटू बेबी आता मोठा झाला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा असे लिहिले आहे.

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील देव, सोनाक्षी या मुख्य व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेने शाहीर शेख आणि एरिका फर्नांडिस यांना रातोरात स्टार बनवले. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. एरिका फर्नांडिस सध्या कसौटी जिंदगी की या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 

एरिका फर्नांडिस तिच्या मालिकांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असली तरी ती नेहमीच तिच्या फॅन्ससाठी वेळ काढते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर टाकलेली पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने इन्टाग्राम स्टोरीमध्ये कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील तिच्या चिमुकल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने विदवान शर्मा या चिमुकल्यासोबतचा तिचा फोटो पोस्ट करून माझा छोटू बेबी आता मोठा झाला आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे लिहिले आहे. 

एरिकाची कुछ रंग प्यार के ऐसे भी ही मालिका संपून कित्येक महिने झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षक चांगलेच मिस करत आहेत. या मालिकेतील देव, सोनाक्षी आणि चिमुकल्या विदवानला आम्ही मिस करत आहोत असे नेहमीच या मालिकेचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात. या मालिकेत सुप्रिया पिळगांवकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्यांच्या भूमिकेचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले होते. या मालिकेतील देव आणि सोनाक्षी यांची तर केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या मालिकेनंतर आजही एरिका आणि शाहीर एकमेकांच्या संपर्कात असून एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा कधी एकत्र पाहायला मिळेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या शाहीर शेख ये रिश्ते है प्यार के  या मालिकेत झळकत आहे. 


Web Title: Erica Fernandes wishes her Kuch Rang Pyar Ke Aise Bhi’s reel son a happy birthday with an adorable photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.