Elaichi and Pancham Reincarnate as Reshma and Lord Pancho in Sony SAB’s Jijaji Chhat Per Hain | 'जिजाजी छत पर हैं' मध्ये इलायची आणि पंचम यांचे पुनर्मिलन
'जिजाजी छत पर हैं' मध्ये इलायची आणि पंचम यांचे पुनर्मिलन

'जिजाजी छत पर हैं' कौटुंबिक मालिका इलायची आणि पंचमच्या काहीशा कठीण मार्गावरून जाणाऱ्या, गुंतागुंतीच्या प्रेमकथेने प्रेक्षकांना आकर्षित करून घेत आहे. आदिवासी प्रकरणाचं नाट्य सगळ्यांसमोर उघडं पडल्यानंतर आता आगामी भागात पंचमसोबत (निखिल खुराणा) राहण्याची शक्यता वाढावी यासाठी इलायची (हिना नवाब) आणखी एक प्लॅन आखणार आहे. 
आपण मागच्या जन्मापासून प्रेमबंधनात आहोत, हे मुरारीला (अनुप उपाध्याय) पटवून देण्याचा प्रयत्न ईलायची आणि पंचम करत असतानाच झोपेत ते दोघे काही विचित्र नावं बडबडतात आणि सगळेच घाबरतात. ते दोघं कोणीतरी रेश्मा आणि भगवान पांचो असल्याचे सांगून वेगळ्या वेशभूषेत सगळ्यांसमोर येतात. आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि ते डॉक्टरला बोलावण्याचं ठरवतात. पिंटू (हरवीर सिंग) डॉक्टर बनून येतो आणि त्यांच्यावर संमोहन केल्याचं भासवतो. पंचम आणि इलायची मागील जन्मी प्रेमी असल्याचं यातून कळतं. या दोघांचं लग्न लावून द्यावं असं तो सुचवतो. मात्र, हे मुरारीला पटत नाही आणि तो पंचमला घराबाहेर काढण्याचं ठरवतो.

पंचमची भूमिका साकारणारे निखिल खुराणा म्हणाले, "पंचम आणि इलायचीने त्या दोघांच्या लग्नासाठी मुरारीला बऱ्याचदा पटवण्याचा प्रयत्न केला आहे. पण, त्याचा काहीच फायदा झालेला नाही. यावेळी त्या दोघांनी पुनर्जन्माचं नाटक केलं आहे. पुढे काय होतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी फारच मनोरंजक असणार आहे. भगवान पांचोच्या रुपात आणखी एका वेगळ्या लुकसाठी मी फार उत्सुक आहे आणि प्रेक्षकांनाही हे आवडेल, याची मला खात्री आहे."


इलायचीची भूमिका साकारणाऱ्या हिबा नवाब म्हणाली, "इलायचीच्या डोक्यात कायमच काहीतरी भन्नाट सुरू असतं आणि पंचमशी लग्न करण्यासाठी आता तिने आणखी एक शक्कल लढवली आहे. आपण रेश्मा असल्याचं भासवण्यात इलायचीला मजा वाटतेय आणि मलासुद्धा छान वाटतंय. इलायची आणि पंचमच्या खोट्या पुनर्जन्माचं काय होतं, हे पाहणं आमच्या प्रेक्षकांसाठी हे फारच मजेशीर असणार आहे."


Web Title: Elaichi and Pancham Reincarnate as Reshma and Lord Pancho in Sony SAB’s Jijaji Chhat Per Hain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.