Ekta Kapoor thanked Zee TV for her success | ​एकता कपूरने तिच्या यशासाठी मानले झी वाहिनीचे आभार

एकता कपूरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात हम पाच या मालिकेपासून केली. बालाजी टेलिफ्लिम्सची निर्मिती असलेल्या हम पाच या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. पाच मुली आणि तिचे आई-वडील यांच्या गंमती जमती प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. आज या मालिकेला अनेक वर्षं झाली असली तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजी आहे. याच मालिकेमुळे एकता कपूर निर्माती म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिच्या कारकिर्दीत झी वाहिनीचा महत्त्वाचा हातभार असल्याचे तिला वाटते.
झी वाहिनीचा झी रिश्ते पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात झी वाहिनीवरून ज्या कलाकारांनी, निर्मात्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली, त्यांना गौरवण्यात आले. आर माधवन, विद्या बालन, सुशांत सिंग रजपूत हे सगळेच कलाकार आज बॉलिवूडमध्ये प्रचंड फेमस आहेत. पण यांच्या सगळ्यांच्या करियरची सुरुवात ही झी वाहिनीवरून झाली आहे. तसेच निर्माती एकता कपूरच्या कारकिर्दीची सुरुवात देखील याच वाहिनीवरून झाली. त्यामुळे एकता कपूर तसेच या कलाकारांपैकी अनेकजण या पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.
झी रिश्ते अवॉर्डस २०१७ मध्ये एकता कपूरला खास रिश्ता हा अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. झी वाहिनीसोबत आजवर तिच्या असलेल्या नात्यासाठी तिला हा खास अॅवॉर्ड देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना एकताच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना आज मी जे काही आहे, ते केवळ झी वाहिनीमुळे असे तिने सांगितले. हा पुरस्कार स्वीकारताना झी वाहिनीने हम पाच या मालिकेसाठी दिलेल्या प्रोत्साहानासाठी तिने या वाहिनीचे आभार मानले. तसेच तिने या वाहिनीवर नेहमीच विविध विषयांवरच्या मालिका आणल्या आणि वाहिनीनेदेखील सगळ्याच प्रोजेक्टमध्ये तिला पाठिंबा दिला असे तिने आवर्जून सांगितले.
केवळ हम पाचच नव्हे तर पवित्र रिश्ता, कुमकम भाग्य, कसम से, जोधा अकबर, कुंडली भाग्य अशा एकताच्या बालाजी टेलिफ्लिम्सच्या अनेक मालिका आजवर प्रेक्षकांना झी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. 

Also Read : तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यने आत्या एकता कपूरला ठेवले ‘हे’ नाव!
Web Title: Ekta Kapoor thanked Zee TV for her success
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.