Ekta Kapoor has suddenly changed the name of the series due to this reason | ​एकता कपूरने या कारणामुळे अचानक बदलले मालिकेचे नाव

‘स्टार प्लस’वरून लवकरच प्रसारित केल्या जाणाऱ्या आपल्या नव्या मालिकेच्या शीर्षकात एकता कपूरने बदल केल्याचे सांगितले जाते. विवेक दहिया आणि करिश्मा तन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बालाजी टेलिफिल्म्स निर्मित या मालिकेचे मूळ शीर्षक शैतान असे होते. पण आता एकता कपूरने सांगितल्यामुळे या मालिकेच्या शीर्षकात अचानक बदल करण्यात आला आहे.
एकता कपूरच्या या नव्या मालिकेचे नाव आता कयामत की रात असे ठेवण्यात आले आहे. एकताने यापूर्वीही अमानवी शक्तींच्या विषयावर यशस्वी मालिकांची निर्मिती केली असली, तरी तिला आपल्या या नव्या मालिकेबाबत सर्व गोष्टी अचूक असतील, याबद्दल ती फार काटेकोर आहे. यातील कलाकारांच्या निवडीपासून निर्मितीच्या बारीकसारीक गोष्टींमध्ये एकताने जातीने लक्ष घातले आहे. या मालिकेची निर्मिती करण्याचा निर्णय तिने का घेतला, याचे कारण देखील खूप रंजक आहे. या मालिकेच्या संकल्पनेवर तिचा अढळ विश्वास असल्यानेच या मालिकेची तिने निर्मिती करण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.
एकताचा ज्योतिषशास्त्रावर खूपच विश्वास आहे. त्यामुळे अंकशास्त्रानुसार या मालिकेच्या नावात बदल करण्यात आला आहे. या मालिकेचे नाव शैतानऐवजी ‘कयामत की रात’ ठेवण्याच्या निर्णयामागे एकताची न्यूमरॉलॉजीवरील श्रद्धा असून तिचा या शास्त्रावर ठाम विश्वास आहे. तिच्या सर्व मालिकांचे नाव ती अंकशास्त्रानुसारच ठेवते हे सगळ्यांनाच माहीत आहे. एकेकाळी तर तिच्या सगळ्याच मालिका क या अद्याअक्षरापासूनच सुरू असलेल्या असायच्या.
एकता कपूरने आज छोट्या पडद्यावर तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. एकताच्या मालिका म्हटल्या की, त्या हिट होणारच असेच म्हटले जाते. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, हम पाच या तिच्या मालिकांनी छोट्या पडद्यावर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तसेच डर्टी पिक्टर, शुटआऊट अॅट लोखंडवाला, वन्स अपॉन टाइम इन मुंबई यांसारखे हिट चित्रपट देखील तिच्या प्रोडक्शन हाऊसने आजवर दिले आहेत. 

Also Read : या कारणामुळे एकता कपूर काम करत नाही शाहरुख खान आणि सलमान खानसोबत

Web Title: Ekta Kapoor has suddenly changed the name of the series due to this reason
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.