Ekta Kapoor gave a break to the two Big Boss contestants | एकता कपूरने दिला बिग बॉसच्या या दोन स्पर्धकांना ब्रेक

बिग बॉसचा सीझन 11 संपून काहीच दिवस झाले आहेत. या शोमधले दोन स्पर्धक म्हणजेच विकास गुप्ता आणि प्रियांक शर्मा लवकरच एका वेबसिरिजमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या वेबसिरिजसाठी बालाजी प्रॉडक्शन हाऊसकडून प्रियांकला अप्रोच करण्यात आले आहे.   

याबाबत विकास म्हणणे आहे की, मी प्रियांक एकमेकांना आधीपासूनच ओळखतो अशातच दोन मित्र एकत्र स्क्रिन शेअर करणे खूपच मजेशीर होऊ शकते. 
डीएनएच्या रिपोर्टनुसार प्रियांक शर्माला एकता कपूरच्या वेबसिरिजसाठी साईन करण्यात आले आहे. विकासने सांगितले, आमच्या दोघांमधील मैत्री वेबसिरिजमध्ये दिसणं इंटरेस्टिंग असेल. 
विकास गुप्ता हा बिग बॉसच्या अंतिम तीन स्पर्धकांपैकी एक होता. तो बिग बॉसच्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मनाला जात होता. शिल्पा शिंदे सोबत झालेल्या भांडणामुळे विकास शोच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला होता. शिल्पाने 'भाभीजी घर पर है' मालिका सोडली त्यावेळी विकास गुप्ता हा अँड टिव्हीचा क्रिएटिव्ह हेड होता.विकासने त्यावेळी शिल्पाची बाजू न घेतल्याने शिल्पाचा विकासवर चांगलाच राग होता.त्यामुळे ती पहिल्या दिवसापासून विकाससोबत भांडताना आपल्याला दिसत पाहायला मिळत होती. अनेक वेळा विकासने भांडणाला कंटाळून बिग बॉसचे घर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला होता. घरातून पळून जाऊ द्या,दोन कोटी रुपये दंड भरायलाही तयार आहे अशी याचना करत असतानाची दृष्यं सा-यांनी पाहिली होती. मात्र काही दिवसांनंतर शिल्पा आणि विकासमधला वाद संपला. प्रियांक आणि विकासमध्ये शोदरम्यान चांगली मैत्री पाहायला मिळाली.

बिग बॉसच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक जणांना बिग बॉस संपून बाहेर आल्यानंतर करिअरला चांगली दिशा मिळाली आहे. याचे सगळ्यात चांगले उदारहण म्हणजे सनी लिओनी. सनी लिओनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली होती आणि ती बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक भाग झाली आहे. त्याचप्रमाणे प्रियांकच्या करिअरला ही चांगला ब्रेक मिळेल अशी आशा करुया.  
Web Title: Ekta Kapoor gave a break to the two Big Boss contestants
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.