Ekta Kapoor did what she did not have her tears in her voice | ​एकता कपूरने असे काय केले की, मॉनी रॉयला तिचे अश्रू आवरले नाहीत

नागिन या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या मालिकेला, या मालिकेच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा भाग नागिन २ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता. नागिन आणि नागिन २ या मालिकेच्या दोन्ही भागांमध्ये मॉनी रॉयने मुख्य भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ही नागिन प्रचंड आवडली देखील होती. नागिन २ ला मिळालेले यश पाहाता या मालिकेची निर्माती एकता कपूर नागिन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. पण नागिन या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. नागिन ३ या मालिकेत प्रेक्षकांना मॉनी रॉय पाहायला मिळणार नाहीये. मॉनी नागिन ३ या मालिकेचा भाग नसल्याचे एकता कपूरने स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितले आहे. 
एकताने नागिन या मालिकेतील एक फोटो पोस्ट करून त्यासोबत एक कप्शन लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, नवी नागिन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नागिनमधील मॉनी रॉय आणि अदा खान यांना आम्ही निरोप देत आहोत आणि नव्या नागिनचे आम्ही स्वागत करत आहोत. लवकरच मी नवीन नागिन लोकांच्या भेटीस आणणार आहोत. आता नागिन की अनेक नागिन हे लवकरच लोकांना कळेल. 
एकताने पोस्ट केलेल्या या फोटोवर मॉनीने लगेचच रिप्लाय दिला आहे. मॉनीने म्हटले आहे की, हे वाचून मला नक्कीच वाईट वाटले. पण मी नवीन नागिन कोण असणार यासाठी खूप उत्सुक आहे. त्यावर एकताने देखील रिप्लाय दिला आहे. एकताने रिप्लायमध्ये म्हटले आहे की, तू नेहमीच बालाजी टेलिफ्लिम्सचा एक भाग असणार आहेस आणि पुढील काळात आणखी मोठ्या गोष्टी तुझी वाट पाहात आहेत आणि आम्ही सगळेच तुला खूप मिस करणार आहोत.
मॉनी रॉयप्रमाणेच अदा खानला देखील या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अदादेखील तिसऱ्या भागाचा हिस्सा नसणार आहे. 

Also Read : मॉनीसोबत लग्न करण्याबद्दल पाहा मोहित काय म्हणतोय?
Web Title: Ekta Kapoor did what she did not have her tears in her voice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.