Due to this, 'what is called this relationship' is on the sets of the film | या गोष्टीमुळे 'ये रिश्ता क्या कहलाता है'मालिकेच्या सेटवर असते धमाल

छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.2 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे. नुकतंच या मालिकेनं अडीच हजार भागपूर्ण केले आहेत.केवळ सर्वात जास्त काळ सुरु असलेली मालिकाच नाही तर या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.हा रेकॉर्ड झाल्यानं ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची टीमसुद्धा भलतीच खुश होती.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला छोट्या पडद्यावर सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेकडून टक्कर मिळत आहे.दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत छोट्या मुलांच्या भूमिका असल्याने सेटवर नेहमीच एक उत्साही आणि गडबडीचे वातावरण असते.मालिकेतील लव आणि कुश या कार्तिकच्या छोट्या भावांनी कैराला म्हणजे कार्तिक(मोहसिन खान) आणि नायरा(शिवांगी जोशी) नेहमीच तत्पर ठेवलेलं असतं. या दोन लहान मुलांनाही मोहसिन आणि शिवांगीचा लळा लागला असून ती आपला मोकळा वेळ नेहमी या दोघांच्या संगतीत घालवितात.शिवांगी जोशीला पहिल्यापासूनच लहान मुले आवडतात. ती सांगते, “आम्हा कलाकारांचं दैनंदिन जीवन तसं कंटाळवाणंच असतं,पण सेटवर लहान मुलं असतील, तर मात्र आमची करमणूक होते. आता आगामी भागांत दिसेल की कौटुंबिक कार्यक्रमात कैराला (कार्तिक व नायरा यांना) एक तान्हे बाळ सोडून दिलेले आढळेल.त्यामुळे मालिकेत आता आणखी एका लहान मुलाचा प्रवेश होणार आहे. या लहान मुलांबरोबर सतत राहणं हे किती आनंददायक आहे. त्यांच्याशी खेळ खेळणं आणि जगाकडे त्यांच्या नजरेतून बघणं हा फारच छान अनुभव असतो.या टप्प्यावर जीवन किती तणावरहित असतं आणि म्हणूनच त्यांच्याबरोबर घालविलेलं प्रत्येक मिनिट आनंददायक असतं.”

नुकतेच या दोघांनी एक  फोटोशूट केले आहे.या फोटोशूटमध्ये दोघांचाही रोमँटीक अंदाज पाहायला मिळतो आहे.दोघेही त्यांच्या केमिस्ट्रीप्रमाणे अगदी स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.फोटोग्राफर प्रशांत समतानीने हे फोटोशूट केले आहेत.एरव्ही ऑनस्क्रीन एकमेकांच्या अथांग प्रेमात बुडलेले नायरा ( शिवांगी जोशी)  आणि कार्तिक( मोहसिन खान) खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.या दोघांच्या अफेअरच्या अफवा कित्येक दिवसांपासून सुरू आहेत.पण त्यांनी याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. पण आता त्यांच्या नात्याची कबुली मोहसिनने दिली आहे.ते दोघे काही महिन्यांपासून नात्यात असल्याचे मोहसिनने म्हटले आहे.
Web Title: Due to this, 'what is called this relationship' is on the sets of the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.