Due to 'Om Shanti Om' success, Kharana gave a visit to the ISKCON temple | ‘ओम शांती ओम’च्या यशासाठी अपारशक्ती खुराणाने दिली ‘इस्कॉन’ मंदिराला भेट

आपला कार्यक्रम हिट व्हावा असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. त्यामुळे प्रत्येक कलाकार त्यावर खूप मेहनत घेत असतो. अपारशक्ती खुराणा आता लवकरच एका कार्यक्रमात झळकणार असून या कार्यक्रमासाठी तो सध्या चांगलाच मेहनत घेत आहे. अपारशक्ती खुराणाने दंगल या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर प्रेक्षकांना तो एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. अपारशक्ती आता एका कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका बजावणार आहे. 
‘स्टार भारत’ या वाहिनीवर प्रेक्षकांना ‘ओम शांती ओम’ हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम भक्ती संगीतावर आधारित आहे. या कार्यक्रमाला यश मिळावे यासाठी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अपारशक्ती खुराणा याने काही स्पर्धकांसह जुहू येथील ‘इस्कॉन’च्या कृष्ण मंदिरात जाऊन नुकतेच कृष्णाचे दर्शन घेतले. याविषयी अपारशक्ती सांगतो, “भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना भक्ती संगीतावर आधारित एक रिअॅलिटी शो पाहायला मिळणार आहे. या आगळ्य़ा कार्यक्रमात मला सूत्रधार म्हणून सहभागी होता आलं, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. दैवी आशीर्वादावर माझा प्रचंड विश्वास असल्यामुळेच या नव्या भक्ती संगीताच्या रिअ‍ॅलिटी शोला यश लाभावे, यासाठी मी काही स्पर्धकांसह जुहू येथील ‘इस्कॉन’च्या कृष्ण मंदिरात जाऊन कृष्णाचे दर्शन घेतले. या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व स्पर्धकही खूप मेहनत घेत असल्यामुळे मी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.”
विनोदाचे अचूक टायमिंग आणि दर्जेदार सूत्रसंचालनाद्वारे अपारशक्ती खुराणा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यात काहीच शंका नाही. अपारशक्ती खुराणा हा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणाचा भाऊ आहे. त्याने आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून सात उच्चके या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये काम केले आहे. पण छोट्या पडद्यावर काम करण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. 
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि गायक-संगीतकार शेखर रावजीयानी तसेच बेबी डॉल या गाण्यामुळे नावारूपाला आलेली कनिका कपूर या कार्यक्रमात प्रेक्षकांना परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Also Read : ‘ओम शांती ओम’च्या सेटवर कनिका कपूरला बसला आश्चर्याचा धक्का

Web Title: Due to 'Om Shanti Om' success, Kharana gave a visit to the ISKCON temple
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.