कपिल शर्मामुळे अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीवर आली आहे ही वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:25 AM2019-06-18T11:25:21+5:302019-06-18T11:27:12+5:30

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कधी सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूप वाईट बातमी आहे.

Due to The Kapil Sharma Show Amitabh Bachchan's Kaun Banega Crorepati has to find new set | कपिल शर्मामुळे अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीवर आली आहे ही वेळ

कपिल शर्मामुळे अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीवर आली आहे ही वेळ

googlenewsNext
ठळक मुद्देआता कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमासाठी नवा सेट शोधण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये. फिल्म सिटीमध्येच या कार्यक्रमाचा सेट उभारण्याचा विचार सध्या सुरू आहे. 

हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे अकरावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा काहीच दिवसांपूर्वी करण्यात आली. या सिझनचा प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. 



 

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कधी सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. पण या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूप वाईट बातमी आहे. या कार्यक्रमाच्या शोच्या कॅम्पेनची जोरदार तयारी सुरू असली तरी अद्याप या कार्यक्रमाचा सेट कुठे असणार यासाठी शोधाशोध सुरू आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा जुना सेट जिथे होता, तिथे आता द कपिल शर्मा शोचे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे आता कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमासाठी नवा सेट शोधण्याचे काम सुरू आहे. 

भास्कर वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरुवातीला फिल्मसिटीमधील विविध स्टुडिओमध्ये केले जात असे. पण द कपिल शर्मा शो काही महिन्यांसाठी ब्रेकवर गेल्यानंतर या कार्यक्रमाचे चित्रीकरण द कपिल शर्मा शोच्या सेटवर केले जात होते. पण द कपिल शर्मा शोने कमबॅक केल्यापासून पुन्हा त्यांनी जुन्या सेटवर शुटिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमासाठी नवा सेट शोधण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये. फिल्म सिटीमध्येच या कार्यक्रमाचा सेट उभारण्याचा विचार सध्या सुरू आहे. 



 

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनची टॅगलाईन खूपच छान आहे. अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी (तुम्ही सतत प्रयत्न केला तर या वेळी हॉट सीटवर बसण्याची तुम्हाला नक्कीच संधी मिळेल.) या प्रोमोमध्ये गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी व्हायचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला अमिताभ सल्ला देताना दिसत आहेत. आशा सोडू नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा... असे त्या महिलेला ते सांगत आहेत. 

 


 

Web Title: Due to The Kapil Sharma Show Amitabh Bachchan's Kaun Banega Crorepati has to find new set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.