Due to dengue infection, he started treatment in hospital | शनायाला डेंग्यूची लागण,रुग्णालयात उपचार सुरु

छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत अभिजीत खांडकेकरने साकारलेली गुरुनाथ,अनिता दातेने साकारलेली राधिका आणि  रसिका सुनीलने साकारलेली शनाया रसिकांचे फेव्हरेट बनले आहेत. माझ्या नव-याची बायको ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे. मालिकेचं कथानक, त्यात दिवसागणिक येणा-या ट्विस्ट रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. विशेषतः राधिका-शनायाची जुगलबंदी आणि दोघींमध्ये अडकलेल्या गुरुनाथची होणारी फजिती यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिकांमध्ये माझ्या नव-याची बायको मालिकेचा समावेश आहे. मात्र सध्या मालिकेच्या फॅन्सची काळजी वाढवणारी एक बातमी आहे. या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील अर्थात रसिका सुनिल धबडगांवकर हिला डेंग्यूची लागण झाली आहे. सध्या शनायावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनाया रुग्णालयातील बेडवर आराम करत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. रुग्णालयात उपचार सुरु असली तरी शनायाच्या चेह-यावरील हसू मात्र कायम असल्याचे दिसत आहे. मालिकेतही बिनधास्त, धम्माल मस्ती आणि जीवनाचा फुलऑन आनंद घेणारी शनाया रसिकांना भावते. त्यामुळे रुग्णालयातील बेडवर उपचार घेणा-या रसिकापेक्षा  बिनधास्त, एन्जॉय करणारी शनायच रसिकांना भावते. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजारातूनही शनायाने अर्थात रसिकाने लवकरात लवकर बाहेर पडेल अशी तिच्या फॅन्सची इच्छा असणार. त्यामुळे आम्हीही म्हणतोय की गेट वेल सून रसिका.मालिकेच्या सुरूवातीला दाखवण्यात आलेल्या भागात राधिका ही गावंढळ असते, तिला काहीही येत नाही असा गुरुनाथचा समज असल्याने तो शनायाकडे ओढला जातो.मात्र आता परिस्थितीचे गांभिर्य समजून राधिकाही आता शनायाला टक्कर देताना दिसतेय.राधिकाचा सर्व समस्यांना सामोरे जाण्याचा एक आत्मविश्वास रसिकांनाही भावतो आहे.त्यामुळे आगामी भागात मालिकेत आणखी रंजक वळण पाहायला मिळणार हे मात्र नक्की.
Web Title: Due to dengue infection, he started treatment in hospital
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.