Due to this 'cause' Megha and Smita have become controversial! | 'या' कारणामुळे मेघा आणि स्मिता मध्ये झाला वाद !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चोर पोलीस हा खेळ रंगला. लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळले पण हा उत्कंठावर्धक खेळ आपण गंमत म्हणून खेळला असला तरी आता या घरामध्ये मात्र या खेळामुळे अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत याची पूर्वकल्पना बिग बॉसने स्पर्धकांना दिली होती. या खेळा दरम्यान झालेल्या काही गोष्टींमुळे मेघा आणि स्मिता मध्ये भांडण होणार आहे. ज्याचे कारण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच. बिग बॉसच्या घरामध्ये काल चोर पोलिसचा खेळ बराच वेळ रंगला असून घरातील काही सदस्यांमध्ये म्हणजेच मेघा, उषाजी आणि रेशम मध्ये काही कारणांमुळे वाद होणार आहेत. ज्यामध्ये रेशमने उषाजींना बजावले आहे कि, मागून बोलण्यापेक्षा मला समोरून बोललेलं जास्त आवडेल... या तिघांमध्ये झालेला हा वाद कुठल्या टोकापर्यंत गेला ? मेघा आणि स्मिता मध्ये वाद का झाला ? आणि बिग बॉसने देलेल्या टास्क मध्ये रहिवाश्यांना यश मिळेल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या भागामध्ये मिळणार आहेत. 

आजच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरातील रहिवाश्यांना बिग बॉस गार्डन एरियामध्ये एका लाल रंगाच्या चौकटीमध्ये उभे रहाण्यास सांगणार असून, त्या चौकटी बाहेर जाण्यास सदस्यांना सक्त मनाई आहे. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद रहणार आहे आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे... तसेच दिवसा अंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधी पर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असे देखील बिग बॉस सूचित करणार आहेत.
Web Title: Due to this 'cause' Megha and Smita have become controversial!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.