"Dr. Tatya Lahane ... Angar ... Power Is Wideen" Movie Television | ​"डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" चित्रपटाच्या टीमने लावली चला हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी

डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा "डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन" हा चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने नुकतीच चला हवा येऊ द्या च्या सेटवर हजेरी लावली. या वेळी या चित्रपटातील मकरंद अनासपुरे, अलका कुबल, निशिगंधा वाड, साधना सरगम, भारत गणेशपुरे, विराग मधुमालती वानखडे, वंदना वानखेडे आणि डॉ. तात्या लहाने उपस्थित होते. यावेळी डॉ. तात्या लहाने यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ते यावेळी म्हणाले, “आज मी जिवंत आहे आणि जे आज मी दिवस पाहतोय ते माझ्या आईमुळेच. जर माझ्या आईनी मला तिची किडनी दिली नसती तर मी आज हे दिवस पाहू शकलो नसतो. आई आपल्या मुलाला एकदाच जन्म देते, पण माझ्या आईनी मला दोनदा जन्म दिला आहे. डॉक्टर पुढे म्हणाले की, डॉक्टरकी हा व्यवसाय नसून ती एक सेवा आहे. त्यामुळे डॉक्टरांनी डॉक्टरकी पेशाला व्यवसाय न समजता ती एक सेवा समजून काम केले पाहिजे. आपल्या देशात रक्तदानचा प्रसार झाला आहे पण अजूनही अवयव दानाकडे लोक गांभीर्याने पाहात नाहीत. आज आपल्या देशात अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विराग वानखेडे यांनी चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात सांगितले की, मी नेत्रदानाच्या या सिनेमाचं वेगळेपण रिले सिंगिंग या उपक्रमाने अधिक वाढवलं आहे. विराग यांनी लिहिलेलं १०८ शब्दांचं हे गाणं तब्बल ३२७ 
या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून अलका कुबल त्यांच्या आई अंजलीबाईंच्या भूमिकेत आहेत. यांच्यासोबत सिनेमात रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांच्या विशेष भूमिका आहेत. 
मसालापटाच्या लाटेत मराठी प्रेक्षक आशयघन विषय शोधू लागले आहेत. अशा चोखंदळ रसिकांसाठी डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन हा सिनेमा उत्तम पर्वणी ठरणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपले डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून जनसमुदायामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉ. तात्या लहाने यांच्यावर तयार झालेली बायोपिक आजच्या तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. 

Also Read : महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे झळकणार एकत्र
Web Title: "Dr. Tatya Lahane ... Angar ... Power Is Wideen" Movie Television
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.