Do you know why Bigg Boss 11 competitor Hiten Tejwani's Gauri Pradhan is with the second marriage | तुम्हाला माहीत आहे का बिग बॉस ११चा स्पर्धक हितेन तेजवानीचे गौरी प्रधानसोबत आहे दुसरे लग्न

गौरी प्रधान आणि हितेन तेजवानी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. कुटुंब, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकांमधील त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तुम्हाला माहीत आहे का गौरीसोबत लग्न करण्याआधी हितेनचे पहिले लग्न झाले होते. हितेनचे हे पहिले लग्न अरेंज मॅरेज होते आणि हे लग्न केवळ ११ महिनेच टिकले होते. पहिले लग्न तुटण्यासाठी तोच कारणीभूत असल्याचे हितेन मानतो. हितेनचे लग्न तुटल्यानंतर काहीच महिन्यात गौरी त्याच्या आयुष्यात आली. गौरी आणि हितेनची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. 
गौरी आणि हितेनने कुटुंब या मालिकेच्या आधी ब्रीज साबणाच्या जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातीच्या वेळी ते एकमेकांशी सगळ्यात पहिल्यांदा बोलले होते. पण या जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या काही तास आधी त्यांनी विमानतळावर एकमेकांना पाहिले होते. पण या जाहिरातीत ते दोघे एकत्र काम करणार याची त्यांना कल्पना देखील नव्हती. हैदराबादच्या विमानतळावर उतरल्यावर जाहिरात संस्थेतील एका व्यक्तीने त्यांची ओळख करून दिली होती. या जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांशी जास्त बोललेच नव्हते. याविषयी हितेनने अनेकवेळा त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, या जाहिरातीनंतर आम्ही कुटुंब मालिकेत काम करायला सुरुवात केली होती. पण सहा महिने झाले तरी हाय आणि बाय या दोन शब्दांशिवाय आमच्यात काहीही संवाद होत नव्हता. गौरी लगेचच लोकांमध्ये मिक्स होत नाही. तिच्या या स्वभावामुळे आम्ही एकत्र काम करत असलो तरी आमच्यात बोलणे होत नव्हते. पण एकदा अचानक ती माझ्या जोकवर हसली. त्यावर तू तुझ्या रूममध्ये गेल्यावर माझ्या जोकवर खूप हसत असशील ना असे मी बोलत संवादाला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही एकमेकांशी गप्पा मारायला लागलो. आम्ही फिरायला एकत्र जायला लागलो. त्यानंतर हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण तरीही गौरीने लग्नासाठी होकार द्यायला अनेक महिने लावले. 
गौरी आणि हितेनने २९ एप्रिल २००३ला पुण्यात लग्न केले. त्यानंतर त्यांनी ९ मे २००३ला मुंबईत त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी रिसेप्शनची पार्टी दिली होती. 

Also Read : बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या सपना चौधरीने का प्यायले होते विष
Web Title: Do you know why Bigg Boss 11 competitor Hiten Tejwani's Gauri Pradhan is with the second marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.