Dilip Bhatnot's ex-wife Daljeet Kaur will soon be caught in a new relationship | ​शालीन भनोटची पूर्वपत्नी दलजीत कौर लवकरच अडकणार नव्या नात्यात

दलजीत कौर आणि शालीन भनोट ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जात असे. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत होती. त्या दोघांनी नच बलिये या कार्यक्रमात भाग देखील घेतला होता आणि याचे विजेतेपददेखील मिळवले होते. पण काही महिन्यांपूर्वी शालीन छळ करत असल्याचा दलजीतने त्याच्यावर आरोप केला होता. तसेच शालीनने हुंड्याची मागणी केली असल्याचेही तिने म्हटले होते. यावरून त्या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले होते. त्यानंतर या दोघांनी नुकताच घटस्फोट घेतला. त्या दोघांना एक मुलगादेखील आहे. दलजीत आणि शालीन गेल्या कित्येक दिवसांपूर्वी वेगळे झाले आहेत. आता दलजीतने सगळे काही विसरून आयुष्यात सेटल व्हायचा निर्णय घेतला आहे. शालीनसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने नव्याने संसार थाटावा अशी तिच्या पालकांची इच्छा आहे आणि त्यामुळे तिने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दलजीतने अरेंज मॅरेज करायचे ठरवले असून ती सध्या अनेक मुलं पाहात आहे. या मुलांमधून ती तिच्या जोडीदाराची निवड करणार आहे. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर ती सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट तिच्या फॅन्सना सांगणार असल्याचे तिने सांगितले आहे.

shaleen bhanot and daljeet kaur


दलजीत आणि शालीनच्या घटस्फोटानंतर मीडियाशी बोलताना शालीनने सांगितले होते, "माझ्या आणि दलजीतच्या घटस्फोटानंतर सध्या मी माझा जास्तीत जास्त वेळ आमच्या मुलासोबत घालवत आहे. मी कितीही चित्रीकरणात व्यग्र असलो तरी त्याला भेटण्याचा मी प्रयत्न करतो. माझा मुलगा जयदन याला भेटल्यानंतर मला एक वेगळेच समाधान मिळते. मी त्याच्यासोबत खेळतो. तो माझ्यासोबत असताना मी एखादा लहान मुलगाच बनतो. दलजीत आणि माझ्यात आजही चांगले संबंध असून आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आज घटस्फोट झाल्यानंतरही आमच्यात कटुता नाहीये, तसेच आमच्या एकमेकांच्या मनात एकमेकांशीविषयी काही वाईट विचार नाहीयेत. आमच्या घटस्फोटाचा आमच्या मुलावर परिणाम होणार नाही याची आम्ही दोघेही नेहमी काळजी घेतो."
शालीनने नुकतेच शेर ए पंजाब या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

Also Read : ​का आठवतेय शालीन भानोतला त्याचे पहिले प्रेम?Web Title: Dilip Bhatnot's ex-wife Daljeet Kaur will soon be caught in a new relationship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.