Did you see the Sun Artistry in 'Baapmunos'? | 'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का?

अल्पावधीतच लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली.घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने आपल्या रंजक कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.दादासाहेब आणि त्यांच्या मुलगा सूर्या ही दोन्ही पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत.दादासाहेबांच्या  मुलाचे पात्रं साकारणे आणि त्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे असे सुयश टिळक म्हणतो.ऑनस्क्रिन अँग्री  यंग मॅन असलेला सुयश मालिकेत नुकतंच गीताच्याप्रेमात पडला आहे.सध्या मालिकेत गीता आणि सूर्या यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव दोघानांही होत आहे.पण गीताची सूर्याच्या घरात घुसमट होत असल्याचं सूर्याला जाणवतंय. सुजाता गीताला तिची पायरी ओळखून वागायला सांगतेय, तसेच तिचा या घरावर काही हक्क नाही आहे त्यामुळे गीताने तिचा रुबाब कमी करून मुकाटपणे घरात राहावं असं देखील सुजाता गीताला बजावते. तिच्या अशा बोलण्यामुळे दुखावल्या गेलेल्या गीताला सूर्या घराच्या बाहेर घेऊन येतो आणि तिने गप्प बसण्याऐवजी ओरडावं-रडावं आणि तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून द्यावी असे सूर्या गीताला सांगतो. त्याचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर गीताला रडू कोसळतं, नकळतपणे तिच्या मनात साचलेल्या भावना तिच्या अश्रूंवाटे बाहेर पडतात. गीता सूर्याला मिठी मारून रडते. सूर्या देखील तिला कवेत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो. सूर्या आणि गीता एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करू शकतील का? त्यांच्या दोघांमधील प्रेम बहरेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना बापमाणूस या मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.हा ऑनस्क्रीन अँग्री यंग मॅन खऱ्या आयुष्यात मात्र कलाप्रेमी आहे.शूटिंगच्या बिझी  शेड्युलनंतर सुयशला मिळालेल्या त्याच्या फावल्या वेळात त्याला चित्र काढायला आणि चिकणमाती पासून शिल्पकला करायला आवडते. नुकतंच सुयशने चिकण मातीपासून घुबडाची कला कृती बनवली आणि त्याचे फोटोज त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.चाहत्यांनी देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.सुयश त्याच्या या आवडीबद्दल बोलताना म्हणाला,'मला कलेची खूप आवड आहे.मी स्वतःला त्यातून व्यक्त करतो.मला चित्र काढायला आणि मातीपासून ऍबस्ट्रॅक्ट स्कल्पचर बनवायला खूप आवडतं.दिवस रात्र शूटिंगमध्ये व्यस्तअसल्यामुळे जेव्हा ही मला फावला वेळ मिळतो तेव्हा मी स्वतःला एका रूममध्ये बंद करतो आणि माझी आवड जोपासतो'.बापमाणूस या मालिकेत रविंद्र मंकणी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, संग्राम समेळ  यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून प्रेक्षकांना ही मालिका आणि मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रचंड आवडत आहेत.

Web Title: Did you see the Sun Artistry in 'Baapmunos'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.