Did you see a photograph of Megha Dhade's daughter competing with Bigg Boss? | ​बिग बॉस मराठीची स्पर्धक मेघा धाडेच्या मुलीचा फोटो तुम्ही पाहिला का?

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमातील अनेक स्पर्धकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमात सध्या मेघा धाडे आपल्याला स्पर्धकाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. तिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मेघा धाडेने मानसन्मान, एक होती राणी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मेघा ही अनेक वर्षं अभिनयक्षेत्रात असली तरी नेहमीच तिने तिचे खाजगी आयुष्य मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
बिग बॉसच्या घरात आल्यापासून अनेक मंडळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. या घरात काही सदस्यांमध्ये सतत वाद होत असले तरी काही मंडळी मजा-मस्ती करताना देखील आपल्याला दिसत आहे. त्याचसोबत ते एकमेकांची दुःख, एकमेकांच्या आयु्ष्यातील चांगल्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत आहेत. मेघा धाडेने तिच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी बिग बॉसमधील तिच्या मित्रमैत्रिणींना काही दिवसांपूर्वी सांगितल्या. या सगळ्या गोष्टी ऐकून घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तिने या कार्यक्रमात सांगितले होते की, ती लग्नाच्या आधीच आई बनली होती. मेघाने समाजाची पर्वा न करता एका चिमुकलीला जन्म दिला. ही चिमुकली आता चांगलीच मोठी झाली असून मेघासाठी तिची मुलगी ही सर्वस्व आहे. मेघा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकवेळा तिच्या मुलीसोबतचे फोटो पोस्ट करत असते. 
मेघाच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या असल्या तरी तिने कधी माघार घेतली नाही. तिने काहीच वर्षांपूर्वी नव्याने तिच्या आयुष्याला सुरुवात केली. तिने काही वर्षांपूर्वी लग्न केले असून तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हॉईस प्रेसिडेंट आहेत. मी कधी लग्न करेन असे देखील मला वाटले नव्हते. पण मी लग्न करावे असे माझ्या घरातल्यांना वाटत होते. त्यामुळे मी अरेंज्ड मॅरेज केले असे तिने बिग बॉस मराठीच्या घरात तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितले होते. 
मेघाच्या पतीचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक पंधरा वर्षांचा मुलगा असून त्या मुलासोबत मेघाचे नाते एखाद्या मैत्रिणीसारखे आहे. तो मेघाला नावानेच हाक मारतो. तिच्या सासरची मंडळी देखील करियरमध्ये तिला खूप सपोर्ट करतात. 

megha dhade daughter photos

Also Read : ​रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्या नात्याबाबत अखेर त्याच्या पत्नीने सोडले मौन...
Web Title: Did you see a photograph of Megha Dhade's daughter competing with Bigg Boss?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.