Did you see the new look of kahe diya pardes fame rishi saxena? | ऋषी सक्सेनाचा नवा लूक तुम्ही पाहिला का?
ऋषी सक्सेनाचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. या मालिकेतील त्याची आणि सायली संजीवची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आज ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी ऋषीने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे. शिवला त्याचे फॅन्स सध्या चांगलेच मिस करत आहेत.

ऋषी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात राहातो. त्याच्या सोशल नेटवर्किंग साइटवर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. त्याने त्याच्या नव्या लूकचा फोटो नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत एक छान कॅप्शन लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला पोस्ट करायला काहीही नसते. पण तरीही तुम्हाला पोस्ट करावेसे वाटते तेव्हा... त्याच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका फॅनने म्हटले आहे की, पोस्ट करायला काही कसे नाहीये, तुझे केस तर बघ... त्याला अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स त्याच्या फॅन्सने दिल्या आहेत. 

ऋषीने केस वाढवले असून या लूकमध्ये तो खूपच छान दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. या फोटोला अनेकांनी लाईक केले असून अनेकजणांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

काहे दिया परदेस ही मालिका संपून बरेच महिने उलटले असले तरी शिवची जागा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. ऋषी हा मराठी नसूनही त्याला मराठीची ओढ आहे. त्यामुळेच तो मराठी इंडस्ट्रीत काम करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याने 'घाडगे & सून' या मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती. तसेच तो 'इश्काची नौका' या व्हिडिओ अल्बममध्ये दिसला होता. तसेच नुकताच तो वक्रतुंड महाकाय' व्हिडिओमध्ये झळकला होता. या गाण्यात ऋषी सक्सेनासह रिचा अग्निहोत्री आणि निरंजन जोशी प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. 

 


Web Title: Did you see the new look of kahe diya pardes fame rishi saxena?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.