Did you see the new form of Sunil Tawdeen? | ​सुनील तावडेंचे नवे रूप तुम्ही पाहिले का?

सुनील तावडे गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत आहेत. त्यांची का रे दुवारा या मालिकेतील कदम ही भूमिका तर प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ते सध्या दुहेरी या मालिकेत काम करत असून ते साकारत असलेल्या परसू या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. त्यांचे एक नवे रूप या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या त्यांच्या नव्या रूपाची सध्या चांगलीच चर्चा आहे.
सुनील तावडेंनी दुहेरी या मालिकेतील त्यांच्या नव्या लूकचा फोटो पोस्ट केला असून हा फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या फोटोत एक वेगळेच सुनील तावडे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सुनील तावडे या फोटोत आपल्याला स्त्रीच्या वेशात दिसत असून ते खूपच सुंदर दिसत आहेत. सुनील तावडे यांनी पोस्ट केलेल्या फोटोत त्यांनी नर्सचे कपडे घातले आहे. त्यावर छानसा आबांडा बांधलेला आहे. एवढेच नव्हे तर या फोटोमध्ये सुनील तावडे यांच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली देखील पाहायला मिळत आहे. माझा दुहेरी या मालिकेतील नवा अवतार असे त्यांनी या फोटोसोबत कॅप्शन दिले आहे. त्यामुळे या मालिकेला आता चांगलेच वळण मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
सुनील तावडे यांनी हा फोटो पोस्ट केल्यापासून काहीच तासात या फोटोला हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुनील तावडे स्त्रीच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

Also Read : सुनील तावडे सांगतायेत लोक मला घाबरायला लागले आहेत...
Web Title: Did you see the new form of Sunil Tawdeen?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.