Did you hear about the new Inning of Kulfipikumar Baajwala Fame Anjali Anand? | ​कुल्फीकुमार बाजेवाला फेम अंजली आनंदच्या या नव्या इनिंगविषयी तुम्ही ऐकले का?

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेत लव्हलीची भूमिका अभिनेत्री अंजली आनंद साकारत आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. तिच्या अभिनयाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, अंजली ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक गुणी नर्तिका देखील आहे.
‘ढाई किलो प्रेम’ मालिकेतील दीपिकाच्या भूमिकेमुळे अंजली आनंद प्रसिद्धीच्या झोतात आली. तिला तिचे वडील दिनेश आनंद यांच्याकडून अभिनयाचा वारसा लाभला आहे. दिनेश यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. इतकेच नव्हे तर अंजलीला नृत्याचाही वारसा तिच्या आईकडून लाभला असून तिची आई एके काळी नामवंत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या समूहात होती.
आता अंजलीला एका आगामी चित्रपटात फरहा खानसोहत एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्याची ऑफर मिळाली असल्याची चर्चा आहे. हे गाणे एका नृत्याच्या प्रसंगावरच आधारित आहे. त्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी अंजलीला चांगलाच वेळ द्यावा लागणार आहे. पण सध्या ती कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने आपल्या तारखांची जुळवाजुळव करत आहे. या गाण्याचे चित्रीकरण लवकरच होणार असून या नव्या इनिंगसाठी अंजली खूपच उत्सुक आहे. अंजली आपल्या नृत्याच्या प्रेमाविषयी सांगते, मी चित्रीकरणानंतर मन प्रसन्न करण्यासाठी तसेच व्यायामाचा भाग म्हणूनही नृत्य करते. 
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत लव्हली आणि सिकंदर या व्यक्तिरेखा अनुक्रमे अंजली आनंद आणि मोहित मलिक साकारत आहेत. मालिकेत या दोन कलाकारांमध्ये पती-पत्नीचे नाते असले तरी त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याचे मालिकेत दाखविण्यात आले आहे तर कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना दिसत आहे. 

Also Read : ‘कुल्फीकुमार बाजेवाला’मधील सरदारजीच्या भूमिकेत असलेली बालकलाकार कोण आहे, हे कळल्यावर बसेल आश्चर्याचा धक्का
Web Title: Did you hear about the new Inning of Kulfipikumar Baajwala Fame Anjali Anand?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.