Did the 'Shagun' of the TVs get publicity? | पब्लिसिटी मिळवण्यासाठी टीव्हीच्या 'शगुन' ने केले हे काम?

छोट्या पडद्यावर 'ये है मोहब्बते' मालिकेतून घराघरात पोहचलेली शगुन म्हणजेच अनिता हसनंदानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये ती मस्तीमध्ये डान्स करताना दिसतेय. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि चश्माही लावला आहे.तिचा व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटीझन्सने संमिश्र प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळत आहे. अनिताने अशा प्रकारे काहीही करून चर्चेत राहण्याचा केलेला प्रयत्न असून निव्वळ हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचेही म्हटले आहे.अनीता हसनंदानीची फॅन फॉलोइंग खुप जास्त आहे.आजपर्यंत अनिताने केलेले सोज्वळ सुंदर भूमिकांमुळेच तिला रसिकांची जास्त पंसीत मिळाली.कलाकार हा भूमिकेमुळेच जास्त ओळखला जातो.त्यामुळे अशा प्रकारे अनिताने डान्स करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत स्वतःची खिल्ली उडवून घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

अनिता गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. तिने काही चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.छोट्या पडद्यावरची एक स्टायलिश अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह असते. नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत  असल्याचे पाहायला मिळते.तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट देत असतात.मात्र सध्या सोशल मीडियावर चाहते नाहीतर अनिताच स्वतःच्या फोटोवर स्तुती सुमनं उधळताना दिसत आहे. नुकताच  अनीताने आपल्या इंस्टाग्रामवर बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफचा एक फोटो शेअर केरत म्हटले की,एका चाहत्याने हा फोटो शेअर करत म्हटले की अनिता आणि करिना दोघेही सारखेच दिसतात. यावरही नेटीझन्सने तिला विविध कमेंट देत आपले म्हणणे तिच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

cnxoldfiles/a> त्याचे लाड पुरवताना दिसतेय.त्यामुळे या पिल्लुमुळे एक नवीन जबाबदारी आल्यासारखे वाटत असून, मी एका आईसारखीच त्याची काळजी घेत आहे.अनिताने  तिचा आनंद तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर  फोटो आणि एक व्हिडीओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.
Web Title: Did the 'Shagun' of the TVs get publicity?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.