Did the Kangana Ranaut as a TV actor makeover? | या टीव्ही अभिनेत्रीने म्हणून कंगना रानौतसारखा केला मेकओव्हर?

छोट्या पडद्यावरील `बढो बहु`च्या मालिकेच्या रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे, कारण मालिकेत एक नवीन ट्रॅक पाहायला मिळणार आहे. पंजाबमधील प्रसिद्ध अभिनेत्री कनिका मान आता लवकरच अभिनयात आपले पाऊल ठेणार आहे.'तितली' या भूमिकेत ती झळकणार आहे.या भूमिकेची विविध  पैलु लक्षात घेवून निर्मात्यांनी तिला एक वेगळाच प्रयोग तिच्या लूकमध्ये केला आहे. तिचा लूक हा कंगना रानौतने 'तनू वेड्स मनू – रिटर्न्स' सिनेमाशी मिळता जुळता असणार आहे.'बढो बहु'मध्ये कनिका मान एका २२ वर्षीय सुवर्णपदक विजेत्या अॅथलिटची भूमिका साकारताना दिसेल.खरे तर,कंगना रानौतच्या  सिनेमातील 'कुसूम' या भूमिकेसारखी यात ती उत्तम फिटिंगची ट्रॅक पँट परिधान केलेली असून टी शर्ट आणि कायम मुलांसारख्या पेहरावात दिसेल.तिचे रुप,तिचे दिसणे,तिचा स्वभाव किंवा तिची वर्तणूक अजिबात नाजूक किंवा मुलींसारखे नाहिये. ती तिचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देत नाही आणि तिची खेळाबद्दलची आवड तिला खास बनवते.या भूमिकेविषयी कनिका मानला विचारले असता ती म्हणाली,तितलीची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.सुरूवातीलाच इतकी चांगली भूमिका मिळणे म्हणजे माझं भाग्यच समजते.या शोची संकल्पना अतिशय आगळी-वेगळी आहे. मला जेव्हा या भूमिकेची ऑफर देण्यात आली,माझ्या मनात लगेचच कंगना राणौत आणि तनु वेड्स मनु-रिटर्न्समधील कुसुमचा लूक आणि व्यक्तिमत्वाबद्दल विचार आला.खरेतर, मी दोन्ही भूमिकांबद्दल समांतर विचार केला आणि त्यामुळे मला माझी भूमिका उत्तमरित्या साकारण्यास मदत होऊ शकली.मला विश्वास आहे की,रसिक मला आणि माझ्या भूमिकेला पसंत करतील.

Also Read:बिकिनीमध्ये दिसली टीव्हीची 'बढो बहू',पाहा PHOTO

मुळात ऑनस्क्रीन बिनधास्त  आणि देसी अंदाजात दाखवली असली तरी ती रिअल लाइफमध्ये मात्र तितकीच बोल्ड आणि बिनधास्त.सध्या रिताशा गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे काही फोटो इन्स्टाग्रावरही शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये ती ब्लॅक बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसतेय.बिकिनीमधला फोटो शेयर करत तिने त्या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.'बढो बहू' तिची पहिलीच मालिका आहे.रिताशा इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असून ती नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.ती सतत अॅक्टीव्ह असल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. 

Web Title: Did the Kangana Ranaut as a TV actor makeover?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.