Despite the injury to the shoulder, the shooting was done by Rahul Sharma! | खांद्याला दुखापत झालेली असतानाही राहुल शर्माने केले शूटिंग!

आपण सगळेच सेलेब्रिटीजच्या झगमगत्या ग्लॅमरस आयुष्यविषयी सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो. असेच ग्लॅमरस आयुष्य आपलेही असावे असेही अनेकांचे स्वप्न असते.नाण्याच्या दोन बाजुंप्रमाणे आपण नेहमी जे दिसतं त्यावर फिदा होता आणि दुसरी बाजू कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. ब-याचदा सिनेमा असो किंवा मालिका कलाकारांना खतरनाक स्टंट करताना आपण पाहतो. कुणी निंदा कुणी वंद मनोरंजन करणे हाच आमचा धंदा म्हणत कलाकार ऑनस्क्रीन स्टंट करतानाही दिसतात. मात्र कधी कधी हे स्टंट करताना वेळ आपली साथ देईलच असे नाही.त्यामुळे कलाकार अनेकदा स्टंट करताना जखमीही होतात.  नुकतेच असाच काहीसा प्रकार एका कलाकारासह घडला.  स्टार भारतव चॅनलवरील शो 'काल भैरव रहस्य' मालिकेतील  अभिनेता राहुल शर्मालाही असाच अनुभल आला. एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळेस राहुलच्या खांद्याला इजा झाली पण आपल्या कामात त्याचा काहीही अडथळा त्याने येऊ दिला नाही.आपले दृश्य त्याने पूर्ण केले आणि मग तो आपल्या मेडिकल टेस्टसाठी गेला.आपल्या दुखापतीबद्दल राहुल म्हणाला, “अभिनयासाठी माझा पहिला नियम म्हणजे कामावरील माझी निष्ठा.मला माझे प्रोफेशन आवडते आणि माझे काम पूर्ण करण्यापासून मला कोणीच थांबवू शकत नाही.एक ॲक्शन दृश्य चित्रीत करताना मी खांद्यावर पडलो.माझ्या प्रॉडक्शन हाऊसने डॉक्टरांना बोलावले.त्यांनी संमती दिल्यानंतरच माझ्या प्रॉडक्शन हाऊसने मला चित्रीकरण करू दिले. मी वेदनेतच चित्रीकरण पूर्ण केले. माझा खांदा मोडला आहे हे मला कळलेच नाही. नंतर एक्सरेमध्ये ते स्पष्ट झाले.”

यापुढेही कितीही संकटं आली तरी त्याचा सामना करण्याची माझी तयारी असणार आहे.अनेकदा शूटींगदरम्यान अमूक कलाकार जखमी झाला अशा अनेक बातम्या आपण ऐकतो. आपल्या कामात चोखपणा आणण्यासाठी भूमिकेत प्राण ओतणा-या प्रत्येक कलाकाराला अशा घटनांना सामोरे जावे लागतेच.मात्र कामादरम्यान सुरक्षेची खबरदारी घेण्याचीही गरज असल्याचेही राहुलने सांगितले. कालभैरव मालिकेत राहुल शर्मा राहुलची,छावी पांडे नम्रताची,शगुन कौर गौरीची,इक्बाल खान इंद्राची,माधवी गोगटे कलावतीची,सोमेश अगरवाल वैद्याची आणि श्याम मशालकर मनोजची भूमिका साकारत आहे.या मालिकेनेही आपल्या कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे.

Web Title: Despite the injury to the shoulder, the shooting was done by Rahul Sharma!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.