Despite being a crorepot in real life, it is a celebrity of Big Boss-11's house competitor, who is it? | रिअल लाइफमध्ये करोडपती असूनही हा सेलिब्रिटी आहे बिग बॉस-11च्या घरातील स्पर्धक,जाणून घ्या कोण आहे तो?

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस-11' हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद,शोमधील अश्लीलता यामुळे बिग बॉसची चर्चा जोरात रंगते आहे. बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांची चर्चा कायमच रंगते. शो संपल्यानंतर या घरातील स्पर्धकांची लोकप्रियता कमी होत नाही.असं असलं तरी बिग बॉसचं विजेतेपद पटकावण्यासाठी प्रत्येकजण खटाटोप करत असतो.बिग बॉसमध्ये सेलिब्रिटी मंडळी आणि कॉमन मॅनपैकी काहींना संधी मिळते.या शोमध्ये कायम चर्चेत राहून बिग बॉस शोचे विजेता बनण्याच्या इराद्याने बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याचा खटाटोप सुरु असतो. बिग बॉसची ट्रॉफी आणि पुरस्काराची रक्कम जिंकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं.मात्र यंदाच्या सीझनमध्ये एक करोडपती सदस्य बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाला आहे.या स्पर्धकाचं नाव अभिनेता विकास गुप्ता असं आहे.कोट्यधीश असूनही तो बिग बॉसमध्ये का सहभागी झाला असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.नुकत्याच प्रसारीत झालेल्या बिग बॉसच्या भागांमधून याच गोष्टीचा प्रत्यय आला.बिग बॉसमध्ये विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे यांचं बिल्कुल पटत नव्हतं.काही ना काही कारणांमुळे दोघांमध्ये खटके उडत होते. घरातील याच वादाला कंटाळून विकास गुप्ताने बिग बॉसच्या घरातून पळण्याचा प्रयत्नही केला.घरातून पळून जाऊ द्या,दोन कोटी रुपये दंड भरायलाही तयार आहे अशी याचना करत असतानाची दृष्यं सा-यांनी पाहिली होती.त्यामुळे इतके पैसे असणारा विकास गुप्ता बिग बॉसमध्ये का असा प्रश्न पडणं साहजिक आहे.दाक्षिणात्य सिनेमात अभिनय करत त्याने आपल्या करियरची सुरुवात केली.'गुमराह', 'कैसी ये यारियाँ'सारख्या शोमध्ये त्याने काम केलं.बालाजी टेलिफिल्म्सच्या 'महाभारत', 'क्योंकी साँस भी कभी बहू थी' तसेच भाभीजी घर पर है अशा शोचा क्रिएटिव्ह हेड ही जबाबदारीही त्याने पार पाडली आहे.पार्थ समाथानशी असलेल्या रिलेशनशिपमुळे विकास चर्चेत आला होता.

शिल्पाने 'भाभीजी घर पर है' मालिका सोडली त्यावेळी विकास गुप्ता हा अँड टिव्हीचा क्रिएटिव्ह हेड होता.विकासने त्यावेळी शिल्पाची बाजू न घेतल्याने शिल्पाचा विकासवर चांगलाच राग होता.त्यामुळे ती पहिल्या दिवसापासून विकाससोबत भांडताना आपल्याला दिसत पाहायला मिळत होती. मात्र आता दोघांमध्येही मैत्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही रुसवे-फुगवे विसरून एकमेकांना सपोर्ट करताना दिसत आहेत.बिग बॉसचा हा 11 वा सिझन आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमधील इंटरेस्टिंग सिझन मानला जात आहे. 

Also Read:बिग बॉस स्पर्धक शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता होते नात्यात दाक्षिणात्य अभिनेत्री गेहना वसिष्ठने केला खळबळजनक खुलासा
Web Title: Despite being a crorepot in real life, it is a celebrity of Big Boss-11's house competitor, who is it?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.