Dense Finale of Dance India Dance 6 | डान्स इंडिया डान्स ६ च्या गँड फिनालेची जोरदार तयारी

झी टीव्हीवरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स आपल्या अद्‌भुत कलागुणांसह आणि जबरदस्त परफॉर्मन्सससह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यासाठी स्पर्धा आता कडवी झाली असून टॉप ५ फायनलिस्ट संकेत, पियुष, नैनिका, सचिन आणि शिवम आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी एकदा शेवटचा प्रयत्न करणार असून या वीकेन्डला प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा ग्रॅन्ड फिनाले पाहायला मिळणार आहे. य़ा फिनालेची जोरदार तयारी  सध्या या कार्यक्रमाची टीम करत असून ते यासाठी अनेक तास सराव करत आहेत. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाच्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी पुढे आले आहेत. रणवीर सिंग, सुशांत सिंग राजपूत यांसारख्या सेलिब्रेटींनी देखील या कार्यक्रमातील स्पर्धकांना आपला पाठिंबा दिला आहे. रणवीर, सुशांत तसेच टेलिव्हिजन अभिनेता नकुल मेहता मार्झीच्या टीममधील सचिन शर्माला मत देण्याचे आवाहन प्रेक्षकांना देत आहेत तर अव्वल कोरिओग्राफर आणि डीआयडी परिवारातील जुने सदस्य रेमो डिसोजा यांनी सोशल मीडियाचा उपयोग मिनी प्रधानच्या टीममधील संकेतला समर्थन देण्यासाठी केला आहे.
डान्सला समर्थन देण्यामध्ये बॉलिवूडने आपले पाऊल उचलले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीममधील सगळेच प्रचंड खूश आहेत. ग्रँड फिनालेला प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन करण्यासाठी सगळेच मेहनत घेत आहेत. मनोरंजनाचा दर्जा उंचावत डान्स इंडिया डान्समधील सलमान, जीतू मोनी, फैसल, हरप्रीत आणि अन्य माजी स्पर्धक टॉप ५ फायनलिस्ट्‌ससोबत परफॉर्म करताना दिसून येतील. एवढेच नाही तर या फिनालेला मास्टर्स मार्झी पेस्तनजी, मिनी प्रधान आणि मुदस्सर खान हे सुद्धा त्यांच्या चार्टबस्टिंग गाण्यांवर अफलातून परफॉर्म करणार आहेत. सूत्रधार अमृता खानविलकर सुद्धा डान्स इंडिया डान्समधील आपल्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी सज्ज झाली आहे. तसेच सुनील ग्रोव्हर आणि साहिल खत्तर तिच्यासोबत ग्रँड फिनालेला सूत्रसंचालकांच्या रूपात दिसून येणार आहे. डान्स इंडिया डान्सचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. हा विजेता कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. 

Also Read : अमृता खानविलकर सांगतेय तिच्या फिटनेसचे गुपित
Web Title: Dense Finale of Dance India Dance 6
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.