Deepika Singh shared the photos with the baby, soon returned to the small screen | ​दीपिका सिंहने शेअर केला बाळासह फोटो,लवकरच परतणार छोट्या पडद्यावर

टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंहने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच चाहत्यांच्या सांगण्यावरून तिने तिच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता.बाळाचा फोटो पाहताच चाहत्यांनी दिपिका सिंहवर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.आता पुन्हा तिने तिच्या बाळाचा एक फोटो टाकला आहे.आणि हा फोटो आता थोडा खास आहे.दीपिकाने बाळाबरोबर हा फोटो काढला आहे.फोटोमध्ये दीपिका मस्त मदरहु़ड एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे.बाळाच्या जन्मानंतर बाळाची नीट काळजी घेता यावी म्हणून ती काही महिने तरी मालिकेचे शूटिंगमधू ब्रेक घेतला आहे.दीपिकाने सोहम ठेवले असून सोहम रोहित गोयल या नावाने तो ओळखला जाणार असे दिपिकाने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले होते.'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली.राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं.त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 'दिया और बाती' या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला होता. दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी ती सध्या वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय. डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी ती वर्कआऊट,डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहे. यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते.आता प्रेग्नंसीमुळे वजन वाढलं होते.त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे. दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत आहेत. त्यामुळेच ती तिचे वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाने एका मालिकेसाठी होकारही कळवला आहे. लवकरच मालिकेच्या शूटिंगला ती सुरूवात करणार असल्याचे चर्चा आहे.
Web Title: Deepika Singh shared the photos with the baby, soon returned to the small screen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.