Deepika Kakkar returns to small screens by 'Night of Doom' | ​‘कयामत की रात’द्वारे दीपिका कक्कर करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

शोएब इब्राहिमसोबत लग्न केल्यानंतर दीपिका कक्कर छोट्या पडद्यापासून दूर गेली होती. दीपिकाने ससुराल सिमर या मालिकेत साकारलेली सिमर ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेने दीपिकाला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळवून दिले. त्यामुळे प्रेक्षकांची ही लाडकी दीपिका छोट्या पडद्यावर परतणार कधी याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 
‘नच बलिये’ या नृत्यविषयक कार्यक्रमात ती शोएबसोबत झळकली होती. पण त्यानंतर दीपिका छोट्या पडद्यावरून गायबच झाली. तिने अभिनयातून काही काळ निवृत्तीच पत्करली होती असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पण आता तिच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ‘स्टार प्लस’वरून लवकरच प्रसारित होणाऱ्या एकता कपूरच्या ‘कयामत की रात’ या नव्या मालिकेत ती एका प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. दीपिका कयामत की रात या मालिकेत जी भूमिका साकारणार आहे, त्या भूमिकेसाठी खरे तर अभिनेत्री मधुरिमाची निवड करण्यात आली होती. मधुरिमाने ऑडिशन्स आणि अन्य औपचारिकता देखील पूर्ण केल्या होत्या. परंतु तिच्या आधीच्या मालिकांच्या तारखा आणि या नव्या मालिकेच्या तारखांमध्ये मेळ साधला जात नसल्याने तिला ही मालिका सोडावी लागली. मधुरिमाशी करार फिस्कटल्यानंतर निर्मात्यांनी या भूमिकेसाठी दीपिकाला विचारले. दीपिकाला देखील लग्नानंतर एका वेगळ्या भूमिकेद्वारे पुनरागमन करायचेच होते. त्यामुळे तिने देखील लगेचच या मालिकेसाठी होकार दिला. 
दीपिकाला कयामत की रात या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड आवडली असून या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास ती खूप उत्सुक आहे. या मालिकेत दीपिका एका नवपरिणित वधूच्या भूमिकेत दिसणार असून तिचा या मालिकेतील लूक अगदी वेगळा असणार आहे.
कयामत की रात या मालिकेत दीपिकासोबतच विवेक दहिया आणि करिश्मा तन्ना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या मालिकेचे मूळ शीर्षक शैतान असे होते. पण एकता कपूरच्या सांगण्यावरून या मालिकेच्या शीर्षकात अचानक बदल करण्यात आला.

Read : 'पलटन' चित्रपटातून आणखीन एक टीव्ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये डेब्यू
Web Title: Deepika Kakkar returns to small screens by 'Night of Doom'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.