Dance with Shammi Kapoor, Popone adopts DanceFlow! | शम्मी कपूरच्या डान्समुव्ह्जसह पपॉनने घेतला डान्सफ्लोअरचा ताबा!

छोट्या पडद्यावरी गाण्यावर आधारित रियालिटी शो,द व्हॉईस इंडिया किड्स प्रतिभाशाली मुले आणि त्यातील वैविध्यपूर्ण थिम्समुळे सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.येणार्‍या भागातदेखील गोल्डन एरा साजरा करण्यासाठी मार्गदर्शक आणि मुलांनी काळे आणि पांढर्‍या रंगाचे कपडे घातलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत.इतकचे नाही तर त्या काळातील अभिनेत्यांची नक्कल करत मार्गदर्शकांना नाचतानादेखील पाहायला मिळणार आहे.स्रोताने दिलेल्या माहितीनुसार, येणार्‍या भागात, ‘सेलिब्रेटिंग गोल्डन एरा’ अशी संकल्पना असून त्या काळातील गाणी गाण्याचे आव्हान स्पर्धकांना देण्यात आले. खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा ८० आणि ९० च्या दशकातील काही अप्रतिम स्टेप्स पुन्हा करण्याचा मार्गदर्शकांनी निर्णय घेतला.पापॉन शम्मी कपूरचा मोठा चाहता असल्यामुळे आणि त्याच्यासारखीच वेशभूषा केल्यामुळे हिमेशने त्याला त्यांच्याप्रमाणे नाचण्यास सांगितले. कोणतीही भीडभाड न ठेवता,‘आजा आजा’ या प्रसिद्ध गाण्यावर पापॉनने नाचण्यास सुरुवात केली. त्याचा नाच बघून जयने खूप मजेशीर कमेंट्स केल्या पण तरीही पापॉनला काहीही फरक पडला नाही आणि त्याने नाचाचा आनंद घेतला.त्यानंतर पलकसोबत नाच करण्यास पापॉनला सांगितले.पापॉनचा हा परफॉर्मन्स पाहून शान म्हणाला, “शम्मी कपूर देव आनंदसारखा डान्स करत आहे असे वाटत आहे.”देव आनंद हेदेखील त्याकाळातील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून गणले गेले होते.हिमेशने शानलादेखील गाणे गाऊन याच गाण्यावर अभिनय करायला सांगितला.मार्गदर्शकांनी या थीमचा फारच आनंद घेतला असे म्हणायला हरकत नाही.

Also Read: पपॉनचे हे सत्य आले समोर,वाचुन बसेल तुम्हाल धक्का!

सेटवरील एका सुत्राने सांगितले की पापोनच्‍या टीममधील सर्व स्‍पर्धकांनी त्‍याला ६० सेकंदांमध्‍ये श्रुतीच्‍या केसांची वेणी घालण्‍याचे आव्‍हान दिले.अनेकांना वाटले की त्‍याच्‍यासाठी हे मोठे आव्‍हान आहे.पण पापोनने दिलेल्‍या वेळेतच सुरेखरित्‍या श्रुतीच्‍या लांब सुंदर केसांच्‍या वेण्‍या घातल्‍या आणि संपूर्ण टीमला आश्चर्यचकीत केले.याबाबत विचारले असता पापोन म्‍हणाला,''मी सुरुवातीला लांब केस ठेवायचो.गेल्‍या २० वर्षांपासून मी स्‍वत:च माझे केस कापतो.मला हेअरकट करायचा असल्‍यास मी सलूनमध्‍ये जात नाही.'' या सर्वोत्‍तम गायकामधील लपलेले हे गुपित ऐकून इतर परीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. 
Web Title: Dance with Shammi Kapoor, Popone adopts DanceFlow!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.