2 MADच्या मंचावर या आठवड्यात रेमो आणि धर्मेश यांनी हजेरी लावली. त्यांनी टॉप 8 स्पर्धकांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. स्पर्धकांनी आपल्या नृत्याची झलक दाखवून रेमो सरांना थक्क केले. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य, त्यांच्यामध्ये असलेला नृत्याबद्द्लचा मॅडनेस, उत्साह, बघून रेमो आणि धर्मेश यांना देखील कार्यक्रमामध्ये स्पर्धकांसोबत डान्स करण्यास भाग पाडले.
या भागामध्ये प्रेक्षकांना एका पेक्षा एक अप्रतिम डान्स बघायला मिळणार आहेत. तुषारने ''बत्तमिज दिल''.... या गाण्यावर अफलातून नृत्य सादर करून रेमोचे मन जिंकले. तुषार तसेच इतर स्पर्धांसोबत रेमोने या गाण्यावर दोन स्टेप केल्या तर सोनलनेदेखील रेमोचे नृत्यदिग्दर्शकन केलेल्या ''पिंगा''...या गाण्यावर नृत्य सादर केले, या गाण्यावर दोन स्टेप खास प्रेक्षकांसाठी सादर केल्या.प्रतीक्षाने ''येऊ कशी प्रिया''' या गाण्यावर कॅब्रे डान्स केला तर पलकने अगदीच तिच्याहून वेगळी नृत्यशैली वापरत ''रखुमाई'' या गाण्यावर नृत्य सादर केले, तसेच राहुलने पॉपपिंग केले. तसेच  2 MAD च्या मंचावर रेमोला एक सरप्राईजही  मिळाले आणि  हे सरप्राईज पाहून तो पहिल्यांदाच टेलिव्हिजन शोवर भाऊक  झाल्याचे पाहायला मिळाले. ते सरप्राईझ म्हणजे रेमोचा वाढदिवस मंचावर साजरा करण्यात आला. तसेच धर्मेश एन्ट्री देखील स्पेशल ठरली.  Web Title: Dance Guru REMO Discovers Birthday Celebration on the stage of 2 MAD!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.