Congratulations! 'This is Mohabbate' series artist will be stuck with silk! | Congratulations!'ये है मोहब्बते' मालिकेचा हा कलाकार अडकणार रेशीमगाठीत!


कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.आता आया मौसम प्यार का म्हणत आणखीन एक टीव्ही अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार आहे.छोट्या पडद्यावरील 'ये है मोहब्बते' मालिकेत अशोक या भूमिकेत झळकलेला अभिनेता संग्राम सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या २५ डिसेंबरला गुरकिरन कौरसह तो लग्न करणार आहे.संग्रामचे हे लग्न लव्हमॅरेज नसून अरेंज्ड मॅरेज आहे.गुरकिरन मुळची नॉर्वेची आहे. सध्या दोघेही लग्नाच्या तयारीत बिझी आहेत.लग्न अमृतसरला होणार असल्यामुळे संग्रामचे मित्रमंडळीही खूप उत्सुक आहेत.त्यामुळेत संग्रामच्याच मित्रांनी ही गुड न्युज चाहत्यांसह शेअर केली आहे.संग्रामचा खास मित्र अॅली गोनी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन संग्राम आणि गुरकिरनचा फोटो शेअर करताच एक समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.संग्रामचा खास फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.आता आपल्या आयुष्याच्या जोडीदारसह या कलाकारांचे वैयक्तीक आयुष्य आणखी खुलावे याच शुभेच्छा चाहते देताना दिसतायेत.संग्रामप्रमाणे 'ये है मोहब्बते' मालिकतलाच रूहीच्या भावाची भूमिका करणारा अभिषेक वर्माच्या प्रेमात अदिती पडली आहे.सेटवर बराच वेळ हे दोघे एकत्र घालवत असतात.एवढेच नाही तर आदिती सोशल मीडियावर नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करत असते.तिच्या सोशल मीडियावरील फोटोलाही तिचे चाहते तिच्या या रिलेशनशिपबद्दल विचारताना दिसतात.अदितीही विचारलेल्या प्रश्नांना बिनधास्त उत्तरेही देताना दिसते.अभिषेकसह ती शूटिंग संपल्यानंतर बाहेरही फिरताना दिसते.अभिषेकचे अदितीच्या फॅमिलीशी खूप चांगले ट्युनिंग असल्यामुळे घरातही या दोघांच्या नात्यामुळे आनंदीत असल्याचे कळतंय.त्यामुळे या दोघांच्याही लग्नाची तारीख ठरली नसली तरीही हे लव्हबर्डही लवकरच लग्नाच्या  बेडीत अडकणार असल्याची माहिती मिळतेय.  
  
Web Title: Congratulations! 'This is Mohabbate' series artist will be stuck with silk!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.