Confirm: Hina Khan becomes the star of 'Khatron Ke Khiladi 8' winner | Confirm:हिना खानला पछाडत हा अभिनेता बनला 'खतरों के खिलाडी' 8 चा विजेता

'खतरों के खिलाडी' 8 व्या सिझन सुरू होण्याआधीपासूनच खूप चर्चेत होता. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धकांपासून ते शोला होस्ट कोण करणार या सगळ्या गोष्टींची जोरदार चर्चा झाली. शोच्या पहिल्या भागापासूनच या शोची लोकप्रियता वाढत होती. गीता फोगाट, लोपामुद्रा राऊत,मनु पंजाबी, मनवीर गुर्जर, करन वाही, शांतनु माहेश्वरी, शिवानी डांडेकर, निया शर्मा, हिना खान, रवि दुबे, मोनिका डोगरा, शाइनी दोशी, रित्विक धन्जानी हे स्पर्धक शोमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये सुरूवातीपासूनच दिलेल्या प्रत्येक टास्क मेहनतीने आणि यशस्वी पूर्ण करण्यामध्ये हिना खान आघाडीवर होती. ''ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरात पहोचलेली अक्षरा म्हणजे हिना खानने ही मालिका सोडल्यानंतर खतरों के खिलाडी या शोमध्ये सहभागी  झाली होती. हिना खानची लोकप्रियता पाहाता हिना खानच  'खतरों के खिलाडी 8वे' सिझन जिंकणार असे सा-यांनाच वाटत होते.मात्र हिना खान नाही तर शांतनु माहेश्वरीने हे 8वे पर्व जिंकले आहे. 

22 जुलैपासून हा शो सुरू झाला होता. या कार्यक्रमाची कंसेप्ट पाहाता प्रत्येक कंटेस्टंटला  खतरनाक स्टंट दिलो जात होते. रोहित शेट्टी प्रत्येकालाच एक जबरदस्त टास्क देत.मिळालेल टास्क पूर्ण करताना स्पर्धकांसह रसिकांनाही धडकी भरत असे.या शोमध्ये असे अनेक एक से बढकर एक स्टंट करत स्पर्धकांनी पूर्ण करत रसिकांचे फुल ऑन मनोरंजन केले आहे.या सगळ्यांमध्ये हिना खान आणि बाकी स्पर्धकांचीच विजेत्याची यादीत नावं आघाडीवर होतं.मात्र अचानक शांतनु माहेश्वरी विजेता बनला त्यामुळे स्पर्धकांसह रसिकांनाही धक्का बसला आहे. आता खतरों के खिलाडीनंतर आता  शांतनु माहेश्वरी  ‘पहरेदार पिया की’ मालिकेच्या सिक्वेलमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.मात्र निर्मात्यांची टीम अ‍ॅप्रोच झालीच नसल्याचे  शांतनु माहेश्वरीने एका मुलाखतीत म्हटले आहे. त्याचबरोबर शांतनू ‘झलक दिखला जा’ या शोचाही भाग राहिला आहे. या शोमध्ये तो परीक्षक जॅकलीन फर्नांडिस हिचा सर्वात क्लोज कंटेस्टेंट होता. 

Also Read:Khatron Ke Khiladi 8 म्हणून हिना खानला रडू कोसळले?
Web Title: Confirm: Hina Khan becomes the star of 'Khatron Ke Khiladi 8' winner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.