Comedian Siddhartha Sagar gets a new TV show! Suddenly disappeared !! | कॉमेडियन सिद्धार्थ सागरला मिळाला नवा टीव्ही शो! अचानक झाला होता गायब!!

‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसलेला कॉमेडियन सिद्धार्थ सागर मध्यंतरी अनेक महिने बेपत्ता होता. तो कुठेय, काय करतोय, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर मोहिम छेडली होती. यानंतर अचानक एकेदिवशी सिद्धार्थने लोकांसमोर येत, अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आई मला ड्रग्ज द्यायची. तिने मला बळजबरीने पागलखान्यात भरती केले होते, असे अनेक आरोप त्याने केले होते. हाच सिद्धार्थ आता टीव्हीवर परतणार आहे. होय, लवकरच सुरु होणा-या ‘कॉमेडी सर्कस’मध्ये त्याला एन्ट्री मिळाली आहे. आता सिद्धार्थ पूर्णपणे ठीक असून पुन्हा एकदा धमाकेदार वापसीसाठी तयार आहे.
सिद्धार्थने कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी यांच्यासोबत स्टेज शेअर केला आहे. ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाफ्टर के फटके’, ‘कॉमेडी सर्कस के अजुबे’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. ‘कॉमेडी नाइट्स लाईव्ह’या शो दरम्यान भारतीशी भांडण झाल्यानंतर सिद्धार्थला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एका एपिसोडदरम्यान सिद्धार्थलाभारतीच्या श्रीमुखात मारायची होती. मात्र सिद्धार्थने ती जोरात मारली. कार्यक्रम संपल्यानंतर याची तक्रार भारतीने प्रोडक्शनकडे केली. यानंतर भारती आणि सिद्धार्थने एकमेकांशी बोलणं बंद केले होते. 

ALSO READ : सिद्धार्थ सागरला ड्रग्जचे व्यसन,आईचा दावा

असे  केले होते आरोप
काही दिवसांपूर्वी एका पत्रपरिषदेत सिद्धार्थने आईवर अनेक आरोप केले होते. माझ्या आईच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एक व्यक्ती आली आणि त्यांच्यासोबत तिला नव्याने आयुष्याला सुरुवात करायचीयं, असे मला सांगितले. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे हा विचार करून मी देखील तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. पण काहीच दिवसांत  आईचे वागणे खूप बदलले.याचदरम्यान  माझे वजन कमी होत होते. त्यामुळे मी स्मोकिंग कमी केले आणि कॉफी जास्त पिऊ लागलो होतो. मी याविषयी आईला सांगितले तर तिने मला सांगितले की, मला बायपोलर नावाचा आजार आहे आणि त्यासाठी ती मला न सांगता माझ्या जेवणातून ड्रग्स देत आहे. या आजाराविषयी ऐकून मला आश्चयार्चा धक्का बसला. कारण मला या आजाराविषयी माहिती होते आणि मला स्वत:मध्ये या आजाराचे संकेत कधीच दिसले नव्हते. माझ्या आर्थिक व्यवहारात सुयश गाडगीळ (आईच्या आयुष्यात असलेली व्यक्ती) ढवळाढवळ करू लागला होता. त्यामुळे अनेकवेळा आमच्यात भांडणं होत असे. माझ्या आईने मला न सांगता माझे ९०-९५ लाख खर्च केले होते. काहीच दिवसांनी त्या दोघांनी मिळून मला रिहॅबिटेशन सेंटरमध्ये टाकले. तिथे माझ्यावर प्रचंड अत्याचार व्हायचे.  काही वेळा तर मी रक्तबंबाळ व्हायचो. माझी शुद्धदेखील हरपायची. कसेतरी करून मी माझ्या मॅनेजरशी संपर्क केला आणि त्याने मला तिथून बाहेर काढले. घरी आल्यावर सगळे काही सुरळीत होईल असे मला वाटत होते. पण मी गोव्याला गेलो असताना मला उचलून पागलखान्यात दाखल करण्यात आले,असे अनेक आरोप सिद्धार्थ केले होते.
Web Title: Comedian Siddhartha Sagar gets a new TV show! Suddenly disappeared !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.