Comedian Bharti has done wild dance on 'disturbing', see video! | कॉमेडियन भारतीच्या भाचीने केला ‘खलबली’वर जंगली डान्स, पाहा व्हिडीओ!

आपल्या दमदार पंचनी लोकांना हसून-हसून लोटपोट करणारी प्रसिद्ध स्टॅण्ड अप कॉमेडियन भारती सिंगने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी अभिनेता रणवीर सिंगच्या ‘पद्मावत’ या सुपरहिट चित्रपटातील ‘खलबली’ या गाण्यावर डान्स करताना बघावयास मिळत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये भारतीने ‘मेरा मोटा खिलजी’ असे लिहिले आहे. हा व्हिडीओ प्रचंड फनी असून, त्यात दिसत असलेली मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून, भारतीची भाची इशिका आहे. इशिकाने हा व्हिडीओ म्यूझिकल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यास भारतीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केला आहे. 

भारतीने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, ‘मेरा मोटा खिलजी, इशिका मिस यू बाबू... लवकरच येणार आहे.’ या व्हिडीओचे वैशिष्ट्ये म्हणजे इशिकाचा अंदाज काहीसा भारतीप्रमाणेच आहे. कारण जणू काही ती तिच्या पावलावर पाऊल टाकण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. इशिकाच्या इन्स्टाग्रामवर असे बरेचसे व्हिडीओ आणि फोटो अपलोड करण्यात आलेले दिसून येतात. 
 

इशिकाने भारतीसोबतचेही बरेचसे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, भारतीने शेअर केलेल्या या व्हिडीओला यूजर्सकडून अतिशय फनी प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ही मुलगी एक दिवस तुला नक्कीच गौरवान्कित करणार. आपल्या टॅलेंटच्या जोरावर ही मुलगी एक दिवस नक्कीच तिचे नाव उज्ज्वल करणार. 
 

तर काही यूजर्सनी लिहिले की, ‘आतापर्यंतचा सर्वांत क्यूटेस्ट खिलजी. दरम्यान, कॉमेडियन भारतीने गेल्या वर्षी हर्ष लिंबचिया याच्याशी लग्न केले. लग्नानंतर लगेचच हे कपल एक महिन्याच्या यूरोप टूरवर गेले होते. भारतीने तिच्या टूरचे काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 
Web Title: Comedian Bharti has done wild dance on 'disturbing', see video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.