सगळी दुःख विसरायला लावत ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसायला भाग पाडणारे या शोचे सर्वच विनोदवीर रसिकांचे लाडके बनले आहेत.त्यामुळे निलेश साबळे,भाऊ कदम,सागर कारंडे,कुशल ब्रद्रिके आणि श्रिया बुगडे सा-यांचे फेव्हरेट आहेत.आपले आवडत्या कलाकार दिवस रात्र एक करून रसिकांचे मनोरंजन करत असतात. त्यामुळे कुणी निंदा, कुणी वंदा.. मनोरंजन करणं हाच आमचा धंदा असं म्हणत कलाकार रसिकांच्या चेह-यावर आनंद खुलवण्याचं काम करणा-या या विनोदवीरांना किती मानधन मिळते असा प्रश्न नेहमीच रसिकांना पडतो. कॉमेडीचे धम्माल टायमिंग, स्कीट करतानाच्या हरकती यामुळे थुकरटवाडीतील या विनोदवीरांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे.छोटा पडदा विनोदवीरांच्या करिअरसाठी टर्निंग पाईंट ठरला असावा.गेल्या अनेकवर्षापासून केलेला स्ट्रगलमुळे आज त्यांना हे यश मिळाले आहे. त्यामुळे छोट्या पडद्याने केवळ ओळखच नाही तर या सगळ्यांना आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनवले आहे.अनेकजण यांना मिळणा-या मानधनाचे विषयी माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर सर्च करताना दिसतात.एका न्युज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, नजर टाकुयात या कलाकारांना चित्रीकरणारसाठी किती मानधन मिळते.
'चला हवा येऊ द्या'च्या मंचवार आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना,हसायलाच पाहिजे असे बोलत आपल्या अनोख्या स्टाईलने सुत्रसंचलान करणारा निलेश साबळे जवळपास सव्वा लाख रूपये इतके मानधन घेतो असे बोलले जाते.तर नेहमी वेगवेगळ्या अंदाजात रसिकांना तुफान हसायला भाग पाडणारा सागर कारंडेही 70 हजार रूपये इतके मानधन घेतो.आपला लाडका विनोदवीर आणि डोबिंवलीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचवणारा आणि आपल्या विनोदीशैलीने रसिकांच्या मनावर गारुड घालणारा भाऊ कदमला 70 हजार इतके मानधन मिळते.आपल्या वैदर्भीय अंदाजात धम्माल कॉमेडीने रसिकांची पसंती मिळवणारा भारत गणेशपुरेला जवळपास 80 हजार इतके मानधन मिळते.

या कार्यक्रमाची एकमेव महिला विनोदी कलाकार म्हणजे श्रिया बुगडेही 80 हजार इतके मानधन घेते.
'हसून हसून लोटपोट' करणारा आणि 'चला हवा येऊ द्या' शो व्यतिरिक्त सोशल मीडियावरही कॉमेडी व्हिडीओ अपलोड करत रसिकांना आपल्या विनोदाने हसून हसून लोटपोट करणारा कुशल बद्रिकेलाही 75 हजार रूपये इतके मानधन मिळते.
Web Title: 'Come on Let's Come' Vinod Beers!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.