The Cold War of Sheena and Priyanka? | शीना आणि प्रियांका यांच्या शीतयुद्ध ?

मालिका मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्हला त्यातील कथानक प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडते आहे. ह्या शोमधील कलाकार एकमेकांसोबत अगदी छान जोडलेले असले तरी शीना बजाज आणि प्रियांका कंदवाल ऊर्फ मेहेर आणि माहिरा यांच्या मात्र सगळं काही ठीक नसल्याचं दिसत आहे. सूत्रांनुसार, “शीना आणि प्रियांका नेहमीच लूक, स्टाईल आणि मेकअपच्या बाबतीत एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. त्यांच्या मनात एकमेकींमुळे असुरक्षिततेची भावना आहे. सुरूवातीला त्यांच्यात सगळं काही ठीक होतं पण आता त्या अगदी एकमेकींसोबत अगदी प्रोफेशनली वागतात.” याबद्दल प्रियांका म्हणाली, “शीना काही माझी मैत्रीण नाहीये. आम्ही सेटवर फक्त काम करायला जातो. ” शीना बजाज म्हणाली, “आमचे संबंध प्रोफेशनल आणि सलोख्याचे आहेत.”


'मरियम खान रिपोर्टिंग लाइव' मालिकाचे कथा भोपाळच्या पार्श्वभूमीवर असणार आहे.या मालिकेपूर्वीही देशना 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'बाल कृष्ण'मालिकेत झळकली होती. सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे.मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान या दिग्गज कलाकारांची मातृभाषा उर्दू असल्याने त्यांनी ती मालिकेतील अन्य कलाकारांना या मालिकेसाठी ही भाषा शिकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान हे जुन्या नबाबी घराण्यातील असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची मातृभाषा उर्दू दाखविण्यात आली आहे.
Web Title: The Cold War of Sheena and Priyanka?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.