'Cinema Premiere League' will be held from April 7 to 27. | ‘चॅम्पियन फिल्में हर दिन’ 7 एप्रिल ते 27 मे दरम्यान होणार ‘सिनेमा प्रीमिअर लीग’

आपल्या आवडत्या अभिनेत्याला नृत्य करताना तुम्ही पाहिले असेल,जिवावरचे स्टंट प्रसंग साकारताना पाहिले असेल, त्यांना तुम्हाला हसवताना पाहिले असेल आणि तुमच्या आवडत्या चित्रपटातून तुमचे मनोरंजन करतानाही पाहिले असेल… पण आता अधिक नाट्य आणि मनोरंजनासाठी तयार रहा. मनोरंजनाच्या क्षेत्रातील सर्वात मोठ्या लढाईला आता प्रारंभ होत आहे.ही लढाई सलमान विरुध्द अक्षय,रजनीकांत विरुध्द आमीर, शाहरूख विरुध्द सूर्या, वरुण विरुध्द टायगर आणि आणखीही बरीच काहीतरी असेल. स्पर्धाशीलता,नाट्यमयता आणि मनोरंजनाचे एक आगळे मिश्रण असलेल्या ‘सिनेमा प्रीमिअर लीग- चॅम्पियन फिल्में हर दिन’ या शीर्षकाखाली ‘ब्लॉकबस्टर चित्रपटांची वाहिनी’ असलेल्या ‘झी सिनेमा’ वाहिनीने या उन्हाळ्याच्या मोसमात निवडक आणि अत्यंत रंजक चित्रपटांचे प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे.आयपीएल क्रिकेट स्पर्धेने प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली असली, तरी छोट्या पडद्यावर अभिनय क्षेत्रातील महारथींमध्ये युध्द सुरू असेल. रविवार, 7 एप्रिल ते रविवार,27 मे या दरम्यान तब्बल सलग 50 दिवस खान रायडर्स, फॅमिली इंडियन्स, साऊथ किंग्ज, कॉमेडी चॅलेंजर्स आणि अ‍ॅक्शन वॉरिअर्स हे पाच संघ एकमेकांशी झुंज घेणार असून सर्व प्रकारच्या चित्रपट शौकिनांची इच्छा पूर्ण करण्यास ते झटतील.


खान रायडर्समध्ये आमीर खान, सलमान खान, शाहरूख खान वगैरे खान कलाकारांच्या दंगल, रईस, वॉण्टेड, चेन्नई एक्स्प्रेस आणि इतर अनेक लोकप्रिय चित्रपटांचा समावेश असेल.मनोरंजनाचा पूर्ण डोस असलेल्या फॅमिली इंडियन्स या गटात नव्या दमाच्या तरूण नायकांच्या आणि पूर्वीच्या अनुभवी लोकप्रिय चित्रपटांचा समावेश असून अक्षयकुमारचा टॉयलेट : एक प्रेमकथा, राजकुमार रावचा बरेली की बर्फी व शादी में जरूर आना या चित्रपटांबरोबरच राजश्री प्रॉडक्शन्सच्या सूरज बडजात्या यांच्या संग्रहातील हम आपके है कौन, हम साथ साथ है, विवाह आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश असेल.वातावरण हलकेफुलके करण्यासाठी कॉमेडी चॅलेंजर्सच्या गटात फुकरे रिटर्न्स, हाऊसफुल, गोलमाल, धमाल आणि फिर हेराफेरी या पाच प्रमुख यशस्वी चित्रपटांच्या मालिकांतील चित्रपटांचा समावेश असेल.दाक्षिणात्य चित्रपटांचा तडका देण्यासाठी साऊथ किंग्ज या गटात रजनीकांत, महेश बाबू, अल्लू अर्जुन ज्युनियर, एनटीआर, सूरिया, विक्रम या सुपरस्टारच्या सूरिया एस3, आय…, टाइम स्टोरी, द रिअल तेवर या आणि इतर अनेक लोकप्रिय चित्रपटांचा समावेश असेल.प्रेक्षकांना थरारकतेचा अनुभव देण्यासाठी अ‍ॅक्शन वॉरिअर्समध्ये अक्षयकुमारचा हॉलीडे, टायगर श्रॉफचा बागी,विद्युत जमवालचा कमांडो-2 आणि इतर अनेक अ‍ॅक्शनपटांचा समावेश असेल.

या सुपरस्टारच्या प्रत्येक संघाचा एक सेलिब्रिटी चाहता हा त्यांच्या संघातील चित्रपटांची निवड करील- मंदिरा बेदी ही खान रायडर्सच्या चित्रपटांची निवड करणार आहे,तर पडद्यावरील आदर्श पती, मुलगा आणि भाऊ असलेला हितेन तेजवाणी हा फॅमिली इंडियन्स या चित्रपटांची निवड करील. शालीन आणि आकर्षक भाभी असलेली सौम्या टंडन ही कॉमेडी चॅलेंजर्सच्या, तर अनिता हसनंदानी ही साऊथ किंग्जच्या चित्रपटांची निवड करील. अ‍ॅक्शन वॉरिअर्सला करण वाहीचा पाठिंबा लाभेल.‘झील’च्या मुख्य मार्केटिंग अधिकारी असलेल्या प्रत्युषा अगरवाल म्हणाल्या, “भारतात क्रिकेट आणि चित्रपट हे दोन धर्मच बनले असून ते सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचं काम करतात. त्यामुळे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी टीव्हीला डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी सिनेमा प्रीमिअर लीग हे स्वाभाविक उत्तर आहे. त्यामुळे मूव्हींना थोडीशी मस्ती देण्याचा निर्णय झी सिनेमा वाहिनीने घेतला असून वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या चित्रपटांमध्ये लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रत्येक गटाला एक सेलिब्रिटी व्यक्ती पाठिंबा देईल.एका अपवादात्मक चित्रपट खेळासाठी पडदा उघडणार असून या संघर्षात विजय आणि पराभव यांच्या व्याख्या बदलून जातील.”झी हिंदी चित्रपट क्लस्टरचे व्यवसाय प्रमुख रुचिर तिवारी म्हणाले, “सिनेमा प्रीमिअर लीग हा एक भव्य उत्सव असून त्यात चित्रपट क्षेत्रातील विविध गट देशातील सर्वात आवडता खेळ खेळतील. हा चित्रपटच असेल, पण त्याला एक वेगळीच कलाटणी मिळालेली असेल. यातील प्रत्येक चित्रपटाचं यश किंवा अपयश हे त्यांच्या चाहत्यांच्या हाती असून प्रत्येक चित्रपटाला लाभलेल्या प्रेक्षकवर्गाच्या आकडेवारीनुसार कोणता चित्रपट अग्रभागी आहे, हे दर आठवड्याला जाहीर केलं जाईल.सिनेमा प्रीमिअर लीगद्वारे आम्ही प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचे चित्रपट दाखविणार आहोत. पाच संघ, 50 दिवसांची मनोरंजन स्पर्धा आणि एक विजेता… चला तर, स्पर्धेला प्रारंभ होऊ द्या!”

खान रायडर्सचे नेतृत्व करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी म्हणाली,“सिनेमावर माझे पहिल्यापासून प्रेम आहे आणि मला आनंद वाटतो की खान रायडर्सचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. शाहरूख खानसोबत दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमध्ये मी काम केले होते. खान कलाकारांवरील प्रेम मी जाणते आणि त्यांच्या ताकदीला तुम्ही कधी कमी लेखूच शकत नाही. पहा खान रायडर्सना झी सिनेमावर आणि त्यांना जिंकवा.”

फॅमिली इंडियन्सचा चेहरा असलेला हितेन तेजवानी म्हणाला, “तुमच्या बच्चेकंपनीसोबत सोफ्यावर बसून मस्तपैकी एखादा मनोरंजक चित्रपट पाहणे आणि त्यासोबत पॉपकॉर्न फस्त करणे हा तुमच्या परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण सर्वांना कुठला चित्रपट पाहायचा आहे हे ठरवणे तेवढे सोपे नाही. माझी टीम फॅमिली इंडियन्ससह

बॉलिवूडमधील सर्वोत्तम फॅमिली ड्रामा अख्ख्या परिवाराच्या नॉनस्टॉप मनोरंजनासाठी पाहायला मिळतील.”कॉमेडी चॅलेन्जर्सना समर्थन देणारी भाभीजी घर पर है अभिनेत्री सौम्या टंडन म्हणाली, “लोकांना रडवणे कदाचित सोपे असेल पण त्यांना हसवणे खूपच आव्हानात्मक आहे.विनोदी प्रकाराशिवाय सिनेमा अपूर्ण आहे.ह्या प्रकाराचा तुम्ही आपल्या अख्ख्या परिवारासोबत आनंद घेऊ शकता.अगदी गंभीर विषय किंवा संदेशही विनोदाच्या माध्यमातून प्रभावीपणे लोकांसमोर मांडता येऊ शकतो.कॉमेडी चॅलेन्जर्सची प्रतिनिधी म्हणून मला खात्री आहे की तुमचे मनोरंजन करून आम्हीच जिंकू.”साऊथ किंग्स समर्थक अनिता हस्सानंदानी म्हणाली, “साऊथ इंडियन चित्रपट एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटसाठी लोकप्रिय आहेत. प्रत्येक वेळेस जेव्हा मी साऊथची डब मूव्ही पाहते, मला त्यातून लेखक, कलाकार, दिग्दर्शक आणि अख्ख्या टीमचे प्रयास दिसून येतात. ह्या चित्रपटांमध्ये अफलातून ऊर्जा असून अॅक्शन, प्रणय, नाट्‌य आणि विनोदाचा हे सुयोग्य मिलाफ असतात.मला स्वतःला हे चित्रपट अतिशय आवडतात आणि म्हणून मी सिनेमा प्रीमिअर लीगमध्ये साऊथ किंग्सना समर्थन देत आहे.” अॅक्शन वॉरियर्सचे कौतुक करताना देखणा अभिनेता करण वही म्हणाला, “बॉलिवूडबद्दल अगदी टिपीकल विचारप्रणाली असली तरी बॉलिवूड म्हणजे केवळ लग्ने, साड्‌या आणि झाडांमागे धावणे नाहीये.भारतीय सिनेमामध्ये अॅक्शनपटही आहेत.दीवारमधील आपल्या भूमिकेनंतर अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून लोकप्रिय झाले.यातून हेच दिसून येते की जोपर्यंत बॉलिवूड चित्रपटात नायक खलनायकासोबत मारामारी करत नाही तोपर्यंत त्याला हीरो म्हटलेच जाऊ शकत नाही.त्यामुळे मी अॅक्शन वॉरियर्सना समर्थन देत आहे.”

Web Title: 'Cinema Premiere League' will be held from April 7 to 27.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.