सीआयडी फेम जसवीर कौरला मुलीच्या जन्मानंतर काहीच दिवसात मिळाली ही दुःखद बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:50 PM2018-07-14T16:50:34+5:302018-07-14T16:52:17+5:30

26 जून रोजी मुंबईतील एस एल रहेजा रुग्णालयात जसवीरने गोंडस मुलीला जन्म दिला. जसवीरने आपल्या मुलीचे नाव नायरा असे ठेवले असून काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. मुलीच्या जन्मामुळे जसवीर चांगलीच खूश होती. पण आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

CID fame Jasveer Kaura, sad news that she had received a few days after the birth of the girl | सीआयडी फेम जसवीर कौरला मुलीच्या जन्मानंतर काहीच दिवसात मिळाली ही दुःखद बातमी

सीआयडी फेम जसवीर कौरला मुलीच्या जन्मानंतर काहीच दिवसात मिळाली ही दुःखद बातमी

googlenewsNext

अभिनेत्री जसवीर कौर गेल्या काही दिवसांपासून चांगलीच खूश होती. तिने सीआयडी, ससुराल सिमर का, घर की लक्ष्मी बेटियाँ, हिटलर दीदी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता सीआयडी या मालिकेने मिळवून दिली. जसवीर गेल्या कित्येक महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून गायब आहे. जसवीर छोट्या पडद्यावरून गायब होण्यामागे एक खास कारण होते. जसवीर गरोदर असल्याने ती गेल्या काही महिन्यांपासून मालिकांमध्ये काम करत नव्हती. 
26 जून रोजी मुंबईतील एस एल रहेजा रुग्णालयात जसवीरने गोंडस मुलीला जन्म दिला. जसवीरने आपल्या मुलीचे नाव नायरा असे ठेवले असून काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. मुलीच्या जन्मामुळे जसवीर चांगलीच खूश होती. पण आता तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण तिच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. तिच्या आई चरनजीत कौर या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. जसवीरने इन्स्टाग्रामद्वारे आईच्या निधनाविषयी सांगितले आहे. जसवीरने 13 जून रोजी हॉस्पिटलमध्ये आईचा वाढदिवस साजरा केला. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत प्लीज गेट वेल सून असे लिहिले होते. पण रुग्णालयातच त्यांनी नुकताच शेवटचा श्वास घेतला. 
जसवीर कौरची मुलगी ही केवळ काहीच दिवसांची आहे. मुलगी झाल्यानंतर तिला प्रचंड आनंद झाला होता. जसवीरचे हे दुसरे लग्न असूून दोन वर्षं डेट केल्यानंतर 6 मार्च 2016 ला तिने विशाल मदलानीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काहीच दिवस आधी म्हणजे 28 फेब्रुवारी 2016 ला त्या दोघांनी साखरपुडा केला होता. जसवीरचे पहिले लग्न 2006 मध्ये अजीज नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. पण दोन वर्षांतच हे लग्न मोडले आणि त्यांचा घटस्फोट झाला. 
जसवीर ही आज प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी ती शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मोहोबब्ते या चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकली होती. 

Web Title: CID fame Jasveer Kaura, sad news that she had received a few days after the birth of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.