''जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे'' हा सुर सध्या सर्वत्र घुमु लागला आहे. ख्रिसमस आणि न्यु इअर सेलिब्रेश अशा दुहेरी मुहुर्त साधत सगळेच सेलिब्रेशनच्या मुडमध्ये बेधुंद होताना दिसतात. ख्रिसमस ट्री डेकोरेशन पासून ते पार्टीचे ऑर्गनाइज करेपर्यंत सगळ्या गोष्टी करण्यात सगळे  बिझी असतात. असाच काहीसा मुड दिसतोय. लव्ह लग्न लोचा मालिकेच्या सेटवरही. या मालिकेतील कलाकारांनी दणक्यात ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले आहे. सगळ्यांनी लाल आणि काळ्या रंगाचा ड्रेसकोड ठरवाला होता. त्यानुसारच ड्रेस परिधान करत सगळ्यांनी पार्टीत हजेरी लावली होती. पार्टी म्हटले की नाच गाणी, चविष्ट पदार्थ अशा सगळ्या गोष्टींची मजा लुटत गाण्यांवर ताल धरत  अतिशय बेधुंद होत सा-यांनी फुल ऑन मजा मस्ती केली. नजर टाकुयात या कलाकारांच्या हटके सेलिब्रेशनवर.

Web Title: Christmas Party Celebration on the set of 'Love Marriage Locha'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.