Chinmoy Uggirkar, Suknya Kulkarni and Bhagyashree Limaye in Ghadge & Soon series hit social media | घाडगे & सून मालिकेतील चिन्मय उद्गिरकर, सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमयेचा फोटो सोशल मीडियावर हिट

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून अक्षयचा कियाराला शोधण्यासाठी सुरू असलेली धडपड आता संपली आहे. कियारा आणि अक्षयची भेट झाली असून अमृता आणि अक्षय कियाराबद्द्लचे सत्य घाडगे परिवारापासून लपवत आहेत. अमृताला ही लपवाछपवी मनापासून पटत नसली तरी देखील ती अक्षय आणि कियाराच्या प्रेमासाठी तसेच अक्षयसोबत सुरू झालेल्या नव्या मैत्रीच्या नात्यासाठी हे सगळे करण्यासाठी तयार झाली आहे. या मैत्रीच्या नात्यामध्ये नकळत एक गंमतीदार गोष्ट घडते. अक्षयच्या रूममध्ये कियारा असताना अचानक माई रूममध्ये येतात, या दरम्यान कियाराला लपविण्यासाठी अमृता आजारी असल्याचे नाटक करते. अमृताला होत असलेल्या कोरड्या उलट्यामुळे माईंना ती गरोदर असल्याचा संशय येतो. आता या संशयामधून कसे अमृता आणि अक्षय बाहेर पडणार? कियाराला ते कसे लपविणार? हे पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेमध्ये सुरू असलेली अमृता, अक्षय आणि कियाराची लपवछपवी अजून किती दिवस घाडगे परिवारापासून लपून राहील हे बघणे गंमतीदार असणार आहे.
मालिकेमधील अमृता घाडगे म्हणजेच भाग्यश्री लिमये हिने मालिकेला तीन महिने पूर्ण झाल्याच्या आनंदात तिचा माई आणि अक्षय सोबतचा फोटो तिच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. या फोटोला अनेक लाईक्स मिळाले आहेत. भाग्यश्रीला तिच्या पहिल्याच मालिकेमधून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून ती आता अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली आहे.
कियारा नुकतीच अक्षयला भेटली असून आता अक्षयसमोर अजून एक अडचण समोर आली आहे आणि ती म्हणजे कियाराच्या आयुष्यात आता अर्जुन नावाच्या मुलाचे स्थळ तिच्या वडिलांनी आणले आहे. त्यामुळे अक्षय आता कियाराला परत मिळवेल कसा मिळवेल? अर्जुनच्या येण्याने मालिकेला कुठले नवे वळण मिळेल? या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मालिकेत मिळणार आहेत. 
या मालिकेत माईची भूमिका सुकन्या कुलकर्णी साकारत असून अक्षयची भूमिका अभिनेता चिन्मय उद्गिरकर साकारत आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 

Also Read : ​घाडगे & सून या मालिकेतील भाग्यश्री लिमयेला होते चिन्मय उद्गिरकरवर क्रश
Web Title: Chinmoy Uggirkar, Suknya Kulkarni and Bhagyashree Limaye in Ghadge & Soon series hit social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.