Children's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 08:00 AM2018-11-14T08:00:00+5:302018-11-14T11:44:57+5:30

काहे दिया परदेस ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.

Children's day special: Kahe diya Pardes fame Sayali Sanjeev Childhood pictures | Children's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो

Children's Day Special : छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाहा लहानपणीचा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देसायली संजीवने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर काही दिवसांपूर्वी तिचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता.हा फोटो काढला तेव्हा ती केवळ एक-दोन वर्षांची असेन. ती या फोटोत खूपच गोंडस दिसत आहे.या फोटोत तिच्यासोबत तिची आई आणि आजी देखील पाहायला मिळत आहेत. 

काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले. या मालिकेत ती साकारत असलेली गौरी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तिला या मालिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.

काहे दिया परदेस ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते. सध्या ती परफेक्ट पती या हिंदी मालिकेत झळकत आहे. तिच्या पहिल्याच हिंदी मालिकेत तिला जया प्रदा सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी लाभल्याने ती सध्या प्रचंड खूश आहे. सायली तिच्या कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची नाशिकची आहे. सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता. तिला स्वतःला पॉलिटिकल सायन्समध्ये प्रचंड रस होता. तिला पॉलिटिकल अॅनालिसिस्ट बनायचे होते. पण कॉलेजमध्ये असताना एका एकांकिकेत तिने काम केले आणि त्या एकांकिकेसाठी तिला राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला. त्या एकांकिकेला प्रवीण तरडे परीक्षक म्हणून आले होते. तू स्क्रिनवर छान दिसशील, ऑडिशन्स दे असे ते तिला म्हणाले आणि या एकांकिकेमुळे तिचा अभिनयप्रवास सुरू झाला. तिने सुरुवातीच्या काळात काही जाहिरातींमध्ये काम केले. प्रियांका चोप्रासोबतदेखील ती एका जाहिरातीमध्ये झळकली होती. त्यानंतर तिला पोलिसलाइन या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

सायली संजीवने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर काही दिवसांपूर्वी तिचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो काढला तेव्हा ती केवळ एक-दोन वर्षांची असेन. ती या फोटोत खूपच गोंडस दिसत आहे. या फोटोत तिच्यासोबत तिची आई आणि आजी देखील पाहायला मिळत आहेत. 

Web Title: Children's day special: Kahe diya Pardes fame Sayali Sanjeev Childhood pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.