This child is a millionaire ownership | ​ही बालकलाकार आहे कोट्यवधीची मालकीण

ये है मोहाब्बते ही मालिका सुरू होऊन अनेक वर्षं झाली आहेत. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळात आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत रुहानिका धवनने आजवर रुही आणि पिहू अशा दोन भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावल्या. या मालिकेमुळे रुहानिकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही रुहानिकाची पहिलीच मालिका होती. रुहानिका तिच्या आईसोबत एका मॉलमध्ये फिरत असताना बालाजी टेलिफ्लिम्समधील एका कास्टिंग डायरेक्टरने तिला पाहिले होते आणि त्यांनी तिच्या आईला विनंती केली होती की, ये है मोहोब्बतेच्या ऑडिशनसाठी रुहानिकाला घेऊन या... पहिल्याच ऑडिशनमध्ये रुहानिकाची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. 

Ruhanika Dhawan
ये है मोहोब्बते ही मालिका गेली चार वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच आपल्याला रुहानिकाला पाहायला मिळाले. रुहानिकाने या चार वर्षांत या मालिकेमुळे प्रसिद्धी, पैसा प्रचंड मिळवला आहे. तिने आजवर अनेक कोटींमध्ये पैसा कमवला असल्याची चर्चा आहे. रुहानिका ही वयाने खूपच लहान असली तरी तिचा स्वतःचा मुंबईत थ्री बीएचके फ्लॅट असून ती ५० लाखांच्या ऑडीत फिरते. रुहानिकाला केवळ या मालिकेमुळेच पैसे मिळतात असे नाहीये तर अनेक जाहिरातींमध्ये देखील ती आजवर झळकली आहे. 
ये है मोहोब्बते या मालिकेतील चिमुकली रुहानिका तिचे शिक्षण सांभाळून चित्रीकरण करते. सकाळी तिला शाळा संपली की ती सेटवर जाते. तिची आई नेहमीच तिच्यासोबत असते. ये है मोहोब्बतेच्या सेटवर रुहानिका सगळ्यांचीच लाडकी आहे. पण या मालिकेत रोमीची भूमिका साकारणाऱ्या रोमीशी ती जास्त क्लोज आहे. रोमी काका हा तिचा लाडका असून चित्रीकरणाच्या वेळी ती जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबतच घालवते. रुहानिकाला तिच्या घरातील सगळेच लाडाने रु अशी हाक मारतात.
रुहानिका सोशल मीडियावर देखील चांगलीच हिट आहे. इन्स्टाग्रामला तिचे अनेक फॉलोव्हर्स असून ती नेहमीच तिचे क्यूट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. 

Also Read : ये है मोहोब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी या कारणामुळे फुकेटला झाली रवाना
Web Title: This child is a millionaire ownership
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.