'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 01:25 PM2018-10-19T13:25:12+5:302018-10-20T06:00:00+5:30

मालिकेत प्रमुख भूमिका निभावणारे नायक नायिका तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतातच पण त्यातील बालकलाकार देखील काही कमी नाही आहेत.

Child actors performance in 'Zee Marathi Awards 2018' | 'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल

'झी मराठी अवॉर्ड्स २०१८'मध्ये बालकलाकारांची धमाल

googlenewsNext
ठळक मुद्देलाडूने केलेल्या स्लोमोशन वॉकवर तर सगळेच जण फिदा झाले

दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार ? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांना आहे. यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.

मालिकेत प्रमुख भूमिका निभावणारे नायक नायिका तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतातच पण त्यातील बालकलाकार देखील काही कमी नाही आहेत. मोठ्यांपेक्षा हे छोटे उस्ताद प्रेक्षकांना भुरळ घातलात. जितकं प्रेम प्रेक्षक प्रमुख कलाकार जोडीवर करतात त्यापेक्षा जास्त प्रेमाचा वर्षाव या बालकलाकारांवर होतो. त्यांची निरागसता आणि या वयात असलेलं त्यांचं उत्तम अभिनय कौशल्य हे प्रेक्षकांना भावतं. झी मराठी परिवारातील छोटे उस्ताद म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको मधील अथर्व, जागो मोहन प्यारे मधील माऊ म्हणजेच छोटी परी, तुझ्यात जीव रंगला मधील सर्वांचा लाडका लाडू आणि बाजी मधील चिचोका यांनी अगदी कमी वेळातच प्रेक्षकांची मने जिंकली. नुकताच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ मध्ये या बालकाकारांनी एक दमदार परफॉर्मन्स सादर केला. जरी ही मुलं वयाने लहान असली तरी मोठ्यानं टक्कर देणारा परफॉर्मन्स त्यांनी सादर केला. लाडूने त्याच्या परफॉर्मन्सने तर सर्व प्रेक्षकांना अक्षरशः त्याच्या प्रेमात पाडलं. लाडूने केलेल्या स्लोमोशन वॉकवर तर सगळेच जण फिदा झाले. यावेळी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्ये या ४ मुलांमध्ये चुरशीचा सामना आहे कारण हे सगळेच अगदी सर्वोत्तम असल्यामुळे त्यातील एकाला विजयी घोषित करणे अवघड असणार आहे. त्यांचा हा दमदार परफॉर्मन्स प्रेक्षक २८ ऑक्टोबर सायंकाळी ७ वाजता झी मराठी अवॉर्ड्स २०१८ सोहळ्यात पाहू शकतील. 

Web Title: Child actors performance in 'Zee Marathi Awards 2018'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.