The chieftain won the title of 'The Voice India Kids' | 'द व्हॉईस इंडिया किड्स'मध्लये या चिमुरड्याने जिंकली सा-यांची मनं

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध गाण्याचा रिअॅलिटी शो ‘द व्हॉईस इंडिया किड्स’ त्यातील प्रतिभाशाली मुलांच्या
गाण्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्येच नाही तर इंडस्ट्रीतील बर्‍याच जणांना प्रभावित करत आहे.येणार्‍या भागात प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सर्व स्पर्धक प्रयत्न करत असताना एका लहान मुलाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले असून त्याच्या परफॉर्मन्सने मार्गदर्शकांनादेखील अवाक केले आहे.अवघ्या चार वर्षांच्या या मुलाने स्टेजवर गाणे गाऊन सगळ्यांचीच मने जिंकून घेतली.या शो मध्ये त्याला देण्यात आलेले महागुरु हे नाव अगदी योग्यच आहे.मिळालेल्या माहितीनुसार,‘तू बोले’ गाण्यावर शेकिनाहने दिलेल्या परफॉर्मन्सनंतर मार्गदर्शकांनी तिचे खूपच कौतुक केले.त्यानंतर जय महागुरुकडून काय म्हटले जाणार असे म्हणाला.त्यावर महागुरु कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल,तर आम्ही तुम्हाला ४ वर्षांच्या प्रतिभाशाली अनुष मुखियाची आज ओळख करून देत आहोत.तो दुसरा तिसरा कोणी नसून शेकिनाहचा लहान भाऊ आहे.बॉडीगार्डमधील प्रसिद्ध ‘आय लव्ह यू’ हे गाणं म्हटल्यानंतर सेटवरील प्रत्येकाने त्याला उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे खुप कौतुक केले.'द व्हॉईस इंडिया किड्स'चा निवेदक जय भानुशालीने चकीत होऊन सांगितले,“या लहान महागुरुकडून मी 'आय लव्ह यू' म्हणायला शिकणार आहे,मला खात्री आहे नक्कीच सगळ्या मुली माझ्या प्रेमात पडतील.”पलक तर या छोट्या मुलाचे कौतुक करून थकत नव्हती आणि तिच्या चेहर्‍यावरील आनंद तिच्या हसण्यातून जाणवत होता.

Also Read:या कारणामुळे हिमेश रेशमिया,पलक मुछाल,पॉपोन आणि शान आपापल्या टीममधून निवडणार फक्त ३ स्पर्धक

'द व्हॉईस इंडिया किड्स'चा ब्लाइंड ऑडिशन्सच्या राऊंडनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. या रंगमंचावर एकाहून एक सरस परफॉर्मन्स पहायला मिळाली आणि त्यांच्यासोबतच या स्पर्धकांना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी परीक्षकांमध्ये रंगलेली चुरसही चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळाले. सर्वच स्पर्धकांनी इतक्या कमी  वयातही स्टेज दणाणून सोडला.कोच हिमेश रेशमिया, पलक मुछाल, पॉपोन आणि शान या चौघांनी आपापल्या टीममध्ये प्रत्येकी १५ स्पर्धक निवडले.आता चार आठवडे चाललेल्या ऑडिशन्सनंतर आता 'द व्हॉईस इंडिया किड्स' हा शो बॅटल राऊंडसाठी सज्ज झाला आहे. आता स्पर्धा अधिक तीव्र, अधिक कठीण होत जाणार आहे.कारण, आता प्रत्येक स्पर्धकाला पुढे जाण्यासाठी प्रत्येक पावलावर उत्कृष्ट कामगिरीच करावी लागणार आहे. हे युद्ध, हे बॅटल पाहण्यासाठी ट्युन इन  'द व्हॉईस इंडिया किड्स' या कार्यक्रमाला तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आलं आहे. 'ब्लाइंड ऑडिशन्स', 'द बॅटल राऊंड' आणि 'द लाइव्ह राऊंड'. आता 'ब्लाइंड ऑडिशन्स' संपल्या आहेत. त्यामुळे आता सुरू होणार आहे 'बॅटल राऊंड'. या राऊंडमध्ये प्रत्येक टीममधील कोचच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला प्रत्येक स्पर्धक त्याच टीममधील इतर स्पर्धकांना टक्कर देईल. प्रत्येक कोच आपल्या टीममधून ३ प्रतिभावान गायकांची निवड करून त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. 
Web Title: The chieftain won the title of 'The Voice India Kids'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.