Chandramukhi Chautala's 'These' videos, Sensations on Social Media, Watch Video! | चंद्रमुखी चौटालाच्या ‘या’ व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ, पाहा व्हिडीओ!

‘एफआयआर’ या मालिकेतील तेजतर्रार हरियाणवी इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला तुम्हाला आठवत असेलच. आपल्या जबरदस्त अभिनय शैली अन् डायलॉग डिलिव्हरीमुळे प्रेक्षकांना आपलेसे करणाºया चंद्रमुखी चौटाला ऊर्फ कविता कौशिकने सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे. आपल्या धडाकेबाज देहबोलीसाठी परिचित चंद्रमुखी सध्या तिच्या हॉट अ‍ॅण्ड सेक्सी जलव्यांमुळे ओळखली जात आहे. सध्या तिने टीव्ही इंडस्ट्रीमधून काहीसा ब्रेक घेतला असून, आपल्या पतीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना ती बघावयास मिळत आहे. अशात कविताने तिचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये तिच्या सेक्सी अदा चाहत्यांना घायाळ करीत आहेत. 

पती रोनित विश्वास याच्यासोबत कविता सध्या सुट्या एन्जॉय करीत आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे ती पतीसोबत सुट्या सेलिब्रेट करीत आहे. तिच्या या व्हेकेशनचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये कविताचा अंदाज खूपच बोल्ड दिसत आहे. वास्तविक हा व्हिडीओ कवितानेच तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. 
 

व्हिडीओमध्ये कविता बिकिनीमध्ये समुद्रात आपल्या अदा दाखविताना दिसत आहे. कविताने हा व्हिडीओ पोस्ट करताच काही वेळातच त्यास हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळाल्या. कविताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे, तर तिचे काही चाहते तिचा हा हॉट अंदाज बघून आश्चर्यचकित झाले आहेत. कारण नेहमीच रफ अ‍ॅण्ड टफमध्ये दिसणारी कविता चक्क हॉट अंदाजात बघावयास मिळत असल्याने चाहत्यांचाही संभ्रम झाल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Chandramukhi Chautala's 'These' videos, Sensations on Social Media, Watch Video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.