chaiwala aka chandan prabhakar is back on the kapil sharma show | कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’!
कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’!

ठळक मुद्देगेल्या काही एपिसोडमध्ये चंदन गायब आहे, हे पाहून तू शोमधून बाहेर पडला का? असा प्रश्न विचारून अनेकांनी चंदनला हैराण करून सोडले होते.

कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’! टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मधून चंदू चायवाला गेल्या काही दिवसांपासून गायब होता. चंदूचे चाहते यामुळे बरेच हिरमुसले होते. पण आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय,‘द कपिल शर्मा शो’मध्ये चंदू परतला आहे. कपिल शर्माची ताजी पोस्ट याचा पुरावा आहे. कपिलने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत कपिल आपल्या गँगसोबत दिसतोय. यात चंदू प्रभाकरही दिसतोय. आधी कदाचित तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. होय, कारण या फोटोत चंदू महिलेच्या गेटअपमध्ये आहे. त्याने पिवळा सलवार सूट घातला आहे.

फोटोत कपिल शर्मा, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग, किकू शारदा असे सगळे आहेत. त्यांच्या हातात होळीचे रंग आहेत. एकंदर काय तर ‘द कपिल शर्मा शो’च्या होली स्पेशल एपिसोडच्या शूटदरम्यानचा हा फोटो आहे.

गेल्या काही एपिसोडमध्ये चंदन गायब आहे, हे पाहून तू शोमधून बाहेर पडला का? असा प्रश्न विचारून अनेकांनी चंदनला हैराण करून सोडले होते. अखेर चाहत्यांच्या इच्छेखातर चंदनने या कार्यक्रमातील अनुपस्थितीबद्दल खुलासा केला होता. तुमच्या प्रेमासाठी आभार. मी कुठलाही एपिसोड जाणीवपूर्वक मिस केलेला नाही. कदाचित माझे पात्र खास प्रभाव दाखवू शकलेले नाही. त्यामुळे त्यांनी मला शोमधून बाद केले आहे, असे त्याने सांगितले होते. पण आता चंदन परतला आहे. चायवाला वा नोकर बनून नाही तर एका नव्या अवतारात. त्याचा हा नवा अवतार चाहत्यांना किती भावतो, ते पाहूच...!!


Web Title: chaiwala aka chandan prabhakar is back on the kapil sharma show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.