"Chair Emperor" game to play in Bigg Boss house! | बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार “खुर्ची सम्राट” खेळ !

बिग बॉसच्या रहिवाश्यांची आजच्या दिवसाची सुरुवात “सावधान सावधान वणवा पेट घेत आहे” या गाण्यावर होणार आहे. काल बिग बॉसने दिलेल्या “खुर्ची सम्राट या खेळावरून घरामध्ये बरीच भांडण झाली.रहिवाश्यांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले. टीम रेशम विरुध्द टीम आस्ताद असे जरी खेळाचे दोन गट असले तरीदेखील टीम रेशम मधील स्पर्धकांनी आस्तादला वगळता बाकी सगळ्यांवर आपली नाराजगी, राग व्यक्त केला. काल या सगळ्यांचीच वेगळी रूपं प्रेक्षकांच्यासमोर आली असे म्हणायला हरकत नाही. घरातील सदस्यांची हि नाराजगी बघता आऊ म्हणजेच उषाजीं सगळ्यांची माफी मागितली.सई लोकुरला टीम रेशमची तिच्याप्रती असलेली वागणूक अजिबात आवडली नाही. या खेळानंतर घरामध्ये खरोखरच दोन ग्रुप पडलेले जाणवत आहेत, ते म्हणजे आस्ताद, रेशम, राजेश, भूषण, विनीत आणि सुशांत तर दुसरीकडे मेघा, उषाजी, पुष्कर, सई आणि ऋतुजा. आता विनीत आणि अनिल थत्ते नक्की कोणत्या गटात आहेत किंवा त्यांना कोणता गट आपलसं करेल हे येणारी वेळचं सांगेल. आज बिग बॉस घरामध्ये खेळा दरम्यान काय होणार ? कोण कोणावर हावी होणार? कोणता संघ विजयी ठरणार ? घरातले वातावरण अजून बिघडेल कि सदस्य हे सगळ सावरून घेतील ? हे बघणे खरोखरच रंजक असणार आहे.आज पुन्हाएकदा बिग बॉसच्या घरामध्ये “खुर्ची सम्राट” हा खेळ रंगणार आहे.परंतु,आज टीम आस्ताद खुर्चीवर बसणार असून टीम रेशम त्यांना खुर्चीवरून उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे खेळत असताना टीम रेशम काल त्यांच्यावर झालेल्या गोष्टींचा बदला घेणार कि सयंमाने खेळणार ते लवकरच कळेल. यामध्ये टीम आस्तादने टीम रेशम पेक्षा जास्त कालावधी पर्यंत खुर्चीवर बसून रहाणे अनिवार्य असणार आहे.खेळाच्या शेवटपर्यंत टीम आस्ताद मधील किमान एक तरी सदस्य त्या खुर्चीवर बसणे महत्वाचे असणार आहे आणि असे झाल्यास ती टीम विजयी ठरणार आहे.

Also Read:बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनिल थत्तेना आली कुटुंबीयांची आठवण !

घरामध्ये होणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा परिणाम अनिल थत्ते यांच्यावर झाला. त्यांनी त्यांच्या मनात असलेल्या काही गोष्टी व्यक्त देखील केल्या. या घरामध्ये कसे ते लोकांची बोलणी ऐकून घेतात, सगळं सहन करतात.या घरामध्ये आपल्या परिवारापासून दूर असताना त्यांची आठवण येणे हे खूपच स्वाभाविक आहे. पण हे सगळं करत असताना त्यांना त्यांच्या बायकोची आणि घराची आठवण आली, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले.त्यांना हे अवघ्या सात दिवसातच कळाले कि, ते त्यांनी त्यांच्या घरच्यांवर अन्याय केला...

Web Title: "Chair Emperor" game to play in Bigg Boss house!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.