To Celebrate Dance, see 'Dance Maharashtra Dance' | डान्सचं सेलिब्रेशन करण्यासाठी पाहा ‘डान्स महाराष्ट्र डान्स’

झी युवावर  'डान्स महाराष्ट्र डान्स' नावाचं वादळ येऊन ठेपलय. विविध प्रकारच्या नृत्य शैलींवर आधारित असलेला हा कार्यक्रम आतापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे . 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अनेकांनी जीवतोड मेहनत घेतली होती. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या शहरात झालेल्या जबरदस्त ऑडिशनमधून अनेकांनी आपले नशीबही आजमावले . याच स्पर्धकातून काही ठराविक स्पर्धक मुंबईच्या स्टुडिओ पर्यंत पोहोचले  आणि आता नृत्याच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे. 

परीक्षक आदित्य सरपोतदार यांना डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाबद्दल विचारले असता त्यांनी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या"  'डान्स महाराष्ट्र डान्स' हे नवे पर्व झी युवावर या बुधवारी २४ जानेवारीपासून सुरु होतंय .हा मंच महाराष्ट्रातील ४ वर्षांवरील तमाम नृत्य प्रेमींसाठी खुला आहे आणि मुख्य म्हणजे त्यावर कसलेही बंधन नाही . यात एखादा डान्सर  सोलो किंवा ग्रुपमध्ये आणि मुख्य म्हणजे विविध नृत्यशैली लोकांसमोर आणू शकतो. त्यात महत्वाची गोष्ट ही आहे, या स्पर्धेत पुढे जायचं असेल तर,  तुम्हाला उत्कट आणि आणि कल्पक डान्सर असणं गरजेचं आहे.  त्यात सोलो ,डुएट आणि ग्रुप असल्याकारणामुळे आम्ही स्पर्धकांची  एकमेकांशी स्पर्धा करू शकत नाही . त्यांनी केलेले जुने नवे परफॉर्मन्स पाहून  उत्तम डान्सरची निवड आम्ही करणार आहोत. 
मला जेव्हा झी युवाने ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या स्पर्धेच्या परीक्षक होण्यासंबंधी विचारलं तेव्हा डान्स च्या कार्यक्रमात मी काय करणार? मी प्रॉफेशनल डान्सर सुद्धा नाही आहे. असा प्रश्न मला पडला.  पण झी युवाचा दृष्टीकोन वेगळा होता, ज्या प्रमाणे मी सिनेमात प्रेक्षकांना काय आवडू शकतं,  हा विचार करून गोष्ट बनवतो ;  त्याच प्रमाणे या कार्यक्रमात मला प्रेक्षकांना आवडणाऱ्या अशा गोष्टी शोधायच्या आहेत . त्यांना माझा तो दृष्टिकोन हवा होता आणि हा झी युवाचा विचार मला खूप महत्वाचा वाटतो. ह्या कार्यक्रमात  भाग  घेतलेला प्रत्येक स्पर्धक काय वेगळं करतोय , तो नक्की कोणती गोष्ट सांगतोय हे पाहण्यासाठी मी या कार्यक्रमात आहे . हा शो करण्यामागे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे , हा मंच ४ वर्षांवरील सर्वांसाठी खुला आहे आणि नृत्य शैलीच कसलेही बंधन सुद्धा नाही त्यामुळे टॅलेंट शोधण्यासाठी हा मंच सर्वोकृष्ट आहे. हा मंच ज्यांच्या रक्तात डान्स आणि मनात महाराष्ट्र आहे त्यांच्यासाठी आहे , या मंचावर आलेला प्रत्येक डान्सर अतिशय टॅलेंटेड आहे जेव्हा 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमात तो त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देईल तेव्हा त्याला भविष्यात यशस्वी डान्सर होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमात सर्वच टॅलेंटेड डान्सर असल्यामुळे स्पर्धेचा दर्जा हा प्रत्येक फेरीबरोबर वाढत चालला आहे.  

आणखी महत्वाचे म्हणजे,  महाराष्ट्रातील सहा शहरांमधून ५ ते ६ हजार डान्सरमधून  ९५ डान्सर आमच्यासमोर आले होते आणि त्यातील ५० डान्सर घेऊन २४ जानेवारीपासून आम्ही आमचा ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ चा प्रवास सुरु करत आहोत. मग त्यातून पुढे डान्सरचे परीक्षण आम्हाला करता येईल. या ५० डान्सरची वैविध्यता भन्नाट आहे. आणि हीच वैविध्यता या कार्यक्रमाला इतर कार्यक्रमांपासून वेगळा करते. त्यामुळेच डान्स महाराष्ट्र डान्स हा वैविध्य आणि मनोरंजन करणारा कार्यक्रम बनला आहे. या कार्यक्रमात सोलो परफॉर्मन्स पासून ग्रुप डान्स, विविध गटातील लहान मुलांपासून अनेक वर्षे डान्स करत असलेले डान्सर आणि लावणी पासून भरत नाट्यम कत्थक ते कंटेम्परी हिप हॉप डान्स पर्यंत सर्व एकाच मंचावर आहे .त्यामुळेच 'डान्स महाराष्ट्र डान्स’ हा कार्यक्रम डान्सचं सेलेब्रेशन करण्यासाठी बनला आहे असे माझे मत आहे . महाराष्ट्रात कोणत्याही कार्यक्रमाला आपल्याला डान्स येत असेल नसेल तरीही ती वेळ आनंदी जावी म्हणून आपण नाचतो, त्याचप्रमाणे प्रेक्षकांनाही हा कार्यक्रम पाहून एक आनंद मिळावा , त्यांनी तो आनंद साजरा करावा ह्याच हेतूने झी युवा हा कार्यक्रम सादर करत आहे. 
Web Title: To Celebrate Dance, see 'Dance Maharashtra Dance'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.