Captaincy's Task to play in Bigg Boss house in Thyagaraja and Sai | बिग बॉसच्या घरात त्यागराज आणि सईमध्ये रंगणार आज कॅप्टनसीचा टास्क

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल देखील रंगला “मिशने ए कुशन” हा टास्क या टास्क मध्ये सई विजयी ठरली. बिग बॉस यांनी दिलेल्या शेवटच्या ऑर्डर मध्ये सईच्या टीमने बाजी मारली. नंदकिशोर यांना रेशमने सईच्या टीमच्या सगळ्या उष्या चांगल्या आहेत हे सांगणे पटले नाही आणि ते त्यांनी रेशमला काल बोलून देखील दाखवले. काल पुष्कर, मेघा, शर्मिष्ठा, सई यांचे नंदकिशोर बरोबर चांगलेच भांडण झाले ज्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वातावरण काही वेळासाठी जरा तापलेलेच होते. परंतु, नंदकिशोर यांना त्या भांडणावरून इतके नक्कीच कळून चुकले कि, पुष्कर, सई, मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा हे पाच जण एकमेकांना धरून आहेत आणि त्यांच्यामध्ये आता चांगली मैत्री आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सई आणि त्यागराज मध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. कोण बाजी मारणार ? कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सदस्यांना दिले कॅप्टनसीचे कार्य. सगळ्या समस्यांना दूर करत स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी म्हणजे “कॅप्टनसी”. यामुळेच बिग बॉस आज सदस्यांवर सोपवणार “फुल्ली – गोळा” हे कॅप्टनसीचे कार्य. फुल्ली गोळ्याच्या डावामध्ये होणार शब्दांचे घाव. याकार्या अंतर्गत टीम सई आणि टीम त्यागराज असे दोन गट असणार आहेत. उमेदवारांना खेळातील त्रिढा सोडवत एका उमेदवाराला जिंकणे हे कॅप्टनसीचे खरे कार्य आहे. 
 

या टास्क मध्ये बरेच मतभेद, भांडण, तसेच एकमेकांना सल्ले दिले जाणार आहेत. सई आणि स्मिता मध्ये वाद रंगणार आहे तर आस्तादला सईच्या बोलण्याची पद्धत पटत नाही असे तो तिला बजावून सांगणार आहे. तसेच कार्यामध्ये सई हे कबूल करणार आहे कि, या घरामध्ये आल्यावर तिला हे कळून चुकले आहे कि प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेण्यासाठी आई – वडील नसतात त्यावर रेशमचे असे म्हणणे असणार आहे कि, “तुला हे कळायला दीड महिना लागला ? आणि यावरूनच रेशमने मेघाला सल्ला देखील दिला कि सई हुशार आहे तिला तिचे डोके आहे तिच्या पायावर तिला उभे राहू दे, तिला उत्तर देऊ दे. रेशमचे असे बोलणे मेघाला अजिबात पटणार नाही आणि ती शर्मिष्ठा आणि आऊला हे बोलून देखील दाखवणार आहे कि, पहिल्यापासूनच यांना माझ्या आणि सईच्या मैत्रीमध्ये फुट पडायची आहे. आता आज फुल्ली – गोळा टास्क मध्ये कोण विजयी ठरणार ? सदस्यांमधील वाद कुठल्या टोकाला जाणार ? कोण बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन होणार ?
Web Title: Captaincy's Task to play in Bigg Boss house in Thyagaraja and Sai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.